जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

श्री क्षेत्र अंतापुरच्या विकासासाठी निधीची गरज-भक्तांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   नाशिक जिल्ह्यातील अंतापूर येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले दावल मालिक या देवस्थानासाठी नाशिक,नगर,संभाजीनगर,धुळे,जळगाव आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पालख्या वर्षभर दर्शनासाठी येत असताना त्या ठिकाणी भाविकांना निवास,पाणी,स्वयंपाकगृह,पालखी निवारा आदी कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत असून वन विभागाची परवानगी घेऊन सरकारने त्यासाठी जिल्हा नियोजन विभागातून आर्थिक तरतूद करून या पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्या अशी महत्वपूर्ण मागणी श्री क्षेत्र पोहेगाव-श्री क्षेत्र अंतापूर पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष रमेशबाबा औताडे यांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच बागलाणचे आ.दिलीप बोरसे यांचेकडे केली आहे.

श्री दावल मालिक बाबा.

“नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंतापूर येथील दावल मलिक बाबा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे.येथे लाखो हिंदू-मुस्लिम समाजाकडून एकत्रितपणे यात्रोत्सव साजरा केला जातो.मात्र याठिकाणी भाविकांना पिण्याची पाइप लाइन,पार्किंग,पायी दिंड्यासाठी प्रशस्त रस्ता,गडावर चढण्यासाठी पायऱ्या,पथदिवे,पाण्याची टाकी,सभामंडप,गडावर वृक्षराजी वाढवणे आदी विकासकामे होणे गरजेचे आहे.त्यासाठी बागलाणचे आ.दिलीप बोरसे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे”-रमेशबाबा औताडे, दिंडीचालक,पोहेगाव,ता.कोपरगाव.

   नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंतापूर येथील दावल मलिक बाबा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे.येथे हिंदू-मुस्लिम समाजाकडून एकत्रितपणे यात्रोत्सव साजरा केला जातो.या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांची नवसपूर्ती होते,विशेषतः पिराची झोळी व फावडी सेवा हि परंपरेनुसार महत्त्वाची मानली जाते.

दिंडीचालक रमेशबाबा औताडे.

   दावल मलिक बाबा यांचे स्थान हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांतील लोकांसाठी आस्थेचे केंद्र मानले जाते.येथे दरवर्षी दावल मलिक बाबांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यात्रेत छबिना मिरवणूक,तमाशा आणि निकाली कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित केला जातो.अनेक कुटुंबांत पिढ्यानपिढ्या दावल मलिक बाबांची सेवा (झोळी,फावडी) करण्याची परंपरा आहे.दावल मलिक बाबा हे एक सूफी संत मानले जातात तर काही जण नाथपंथी मानतात.त्यांच्यावर असलेल्या अढळ विश्वासामुळे अनेक भाविक येथे नतमस्तक होतात.श्री क्षेत्र अंतापूर आणि दावल मलिकअंतापूर हे सद्गुरू श्री शंकर महाराजांचे जन्मगाव म्हणूनही प्रसिद्ध आहे.गावात दावल मलिक बाबांचा दर्गा आणि शंकर महाराज मंदिर अशी संमिश्र धार्मिक संस्कृती पाहायला मिळते.परिणामी या ठिकाणी गुरुवार खेरीज दत्तजयंती, चैत्रपोर्णिमा,गुरुपोर्णिमा,श्रावण महिना,चैत्र महिना,गुढीपाडवा,नवरात्र उत्सव,दसरा,दिवाळी,रामनवमी आदी सण उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठी यात्रा भरत असते.मात्र त्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांना सोयी सुविधा मिळताना दिसत नाही.

अंतापूर येथील दावल मालिक बाबा गड.

   या ठिकाणी भाविकांना पिण्याची पाइप लाइन,पार्किंग,पायी दिंड्यासाठी प्रशस्त रस्ता,गडावर चढण्यासाठी पायऱ्या,पथदिवे,पाण्याची टाकी,सभामंडप,गडावर वृक्षराजी वाढवणे आदी विकासकामे होणे गरजेचे आहे.तरी वन विभागाची परवानगी घेऊन जिल्हा वार्षिक योजना मधील प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास निधीतून या विकास कामासाठी मंजुरी मिळावी अशी मागणी केली आहे.या पूर्वी अनेक भक्तांनी पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही.त्यामुळे या बागलाण विधानसभा मतदार संघाचे आ.दिलीप बोरसे यांनी या कामी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यांनी या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करून भाविकांची सुविधा करावी अशी मागणीही कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील दिंडी चालक रमेशबाबा औताडे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close