आंदोलन
आकारी पडीत शेतकऱ्यांना अदखल केल्यास,जेलभरो…यांचा इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
शासन जमिनीचे मालक कधीच झालेले नसून शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या नाहीत असे आशयाचे पत्र शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सादर केल्यानेच संभाजीनगर उच्च न्यायालयाने आठ आठवड्यांत जमिनी वाटपासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश १४ ऑगस्ट २०२४ राज्य सरकारला दिल्यानंतर,सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊनही सरकार मुळ वारसांना जमीन वाटपाचा निर्णय घेत नसल्याने आज आम्हाला आत्मक्लेश आंदोलन करावा लागले.या आंदोलनाची दखल १५ दिवसात महायुतीच्या सरकारने घेतली नाही तर जलभरो आंदोलनानंतर जमिनीवर कब्जा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित आवळे यांनी आज एका आंदोलनादरम्यान दिला आहे.

आज सकाळी ११ वाजता नेवासा रोडवरील बाजार समिती आवारापासून अँड.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली ९ गावातील हजारो महिला पुरुष अबालवृद्ध आकारी पडीत शेतकऱ्यांचा मोर्चा महात्मा गांधी पुतळ्याकडे निघाला.रस्त्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर,हनुमान मंदिर नंतर महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भर उन्हात दुपारी १२ वाजता अँड.अजित काळे यांच्या समवेत हजारो आंदोलक रस्त्यावर बसले.तीन तासांपेक्षा अधिक वेळ शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन हे चर्चेचा विषय ठरले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील ०९ गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळपास सात हजार पाचशे एकर मूळ शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा आदेश १४ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून दिला होता त्यात राज्य शासनाला ०२ महिन्यात याबाबतचा कायदा करून मूळ मालकांच्या वारसांना जमिनी देण्याचे आदेशित केलेले असता त्यास पावणेदोन वर्षे उलटत आले आहे तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली तर नाहीच उलट न्यायालयाचा आदेशाचा अवमान करत शेती महामंडळाने सदर 04 हजार एकर जमिनी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना सार्वजनिक व खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचे प्रयोजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यामुळे या नऊ गावातील शेतकऱ्यांत मोठा संताप व्यक्त होत आहे.परिणामी या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.त्यात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेती महामंडळाच्या हरिगांव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव,वडाळा महादेव,ब्राम्हणगांव,उंदीरगांव,खैरी निमगांव,खानापूर,माळवाडगांव,मुठेवाडगांव या ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांचे उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

श्रीरामपूर तालुक्याचे कॉग्रेसचे आ.हेमंत ओगले यांनी विधानसभेत आवाज ऊठविण्याचा प्रयत्न केला.परंतू उर्वरित काळात पोटतिडकीने आम्हा कष्टकरी आकारी पडीक शेतकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीने उचलून धरल्यास आम्ही तुमचे कौतुक करू असे अँड.अजित काळे म्हणाले असल्याचे दिसून आले आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रूपेंद्र काले,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुकाध्यक्ष युवराज जगताप,प्रकाश चित्ते,सुरेश ताके,शालनबाई झुराळे गंगाधर चौधरी,सचिन वेताळ,शरद आसने,दत्तात्रय मुठे,शिवाजी गायकवाड आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेतकरी,महिला उपस्थित होत्या.

“वर्तमानात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४ हजार एकर ‘झेड आर टू’ कंपनीला देण्याचा मुद्दा अधिवेशनात खुप गाजतो आहे.मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षाचे आ.विजय वडेट्टीवार यांनी ४ हजार एकर जमीन व त्या जमिनींचे व्हॅल्युवेशन सभागृहाचे निदर्शनास आणून दिले.मात्र या जमिनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या आहेत याबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही ही बाब खेदजनक आहे”-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या आकारी पडीक जमिनी वाटपा संदर्भात ईतिहास पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे.या संदर्भात शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.परंतू आपण अशीच खंबीर साथ दिली तर यशोशिखर दूर नाही.आम्ही शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत मात्र आमच्या वाडवडिलांच्या हक्काच्या जमिनी संदर्भात स्थानिक आमदार,खासदार,मंत्री कुणीही मदत केली तर त्यांना डोक्यावर घेऊ.मात्र राजकारण केले तर त्यांना बदडून काढू असा इशारा शेवटी अँड.काळे यांनी शेवटी दिला आहे.

दरम्यान यावेळी आंदोलनात प्रतिकात्मक महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आत्मक्लेश आंदोलक महिला पुरुषांचे आकर्षण ठरले.आत्मक्लेश आंदोलन म्हटल्यावर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपापल्या गावातून प्रतिकात्मक चेहऱ्यांची निवड केली होती.महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा खानापूर येथील उत्तम शिंदे (गोसावी) तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा टाकळीभानचे कार्लस साठे सर यांनी हातात संविधान प्रत घेऊन हुबेहुब वठवली आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रूपेंद्र काले,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुकाध्यक्ष युवराज जगताप,प्रकाश चित्ते,सुरेश ताके,शालनबाई झुराळे गंगाधर चौधरी,सचिन वेताळ,शरद आसने,दत्तात्रय मुठे,यांनी मनोगत व्यक्त केले आहे.व सरकारी धोरणावर कठोर टीका केली आहे.
यावेळी तहसिलदार मिलिंद वाघ,शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.दरम्यान अनेक वर्षांपासूनच्या तालुक्यात थंडावलेल्या मोर्चा बऱ्याच वर्षाने निघालेल्या या मोर्चास गावातील गावोगावचे शेतकरी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह महिला पुरुष तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



