जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या पतसंस्थेने ठेवीदारांची विश्वासार्हता जपली-अभिनेते अनासपुरे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता लिक्विडिटी बेस्ड स्कीम अंतर्गत ठेवीदारांच्या १०० टक्के ठेवी सुरक्षित असून संस्थेचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी सभासद,ठेवीदारांशी जपलेली विश्वासार्हता, संस्थेच्या आर्थिक योगदानामुळे आपण समता पतसंस्था आणि सुधन गोल्ड लोनसह समता परिवारासोबत जोडला असल्याचे प्रतिपादन मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

   

“समतात सभासद,ग्राहकांनी ठेवलेले पैसे आमचे नसून ठेवीदारांचे,सभासदांचे आहे.त्या पैशांना पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे.ही आमची जबाबदारी असून ती आम्ही पूर्णपणे सांभाळत आहोत तद्वत.पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींना १०० टक्के संरक्षण देत आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष, समता नागरी सहकारी पतसंस्था,कोपरगाव.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेने १०० कोटी रुपये ठेवी व २५ कोटी रुपये सोनेतारण कर्ज उद्दिष्टपूर्तीबद्दल सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता व शिर्डी शाखेच्या ग्राहकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.त्या वेळी राहाता व शिर्डी शाखेच्या सभासद व ग्राहकांसोबत संवाद साधताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

  सदर प्रसंगी भाजप नेते राजेंद्र पिपाडा,माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा,मल्टीस्टेट फेडरेशन संचालक शिवाजी आप्पा कपाळे,साई आदर्श पतसंस्था अध्यक्षा संगीता कपाळे,राहाता फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे,उपाध्यक्ष साहेबराव निदाने,राहाता पीपल्स अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी,साई अरिहंत पतसंस्था चेअरमन सतीश गंगवाल,साई नागरी पतसंस्था चेअरमन अशोक कोते,साई संस्थान को-ऑप क्रेडिट सोसायटी अध्यक्ष विठ्ठलराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे,श्री गुरुदेव दत्त पतसंस्था अध्यक्ष पुखराज पिपाडा, नवनाथ पतसंस्था अध्यक्ष धनंजय गाडेकर, डॉ.के.वाय.गाडेकर धन्वंतरी पतसंस्था
अध्यक्ष स्वाधीन गाडेकर,यशवंत पतसंस्था चेअरमन भास्कर फणसे,श्री स्वामी समर्थ महिला पतसंस्था अध्यक्षा अंजली सदाफळ, कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूल कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे आदी प्रमुख मान्यवरांसह संस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे,राज कुमारजी बंब,गुलशन होडे,सरव्यवस्थापक सचिन भट्टड,प्रल्हाद दंडवते,सतिष वैजापुरकर,लता डांगे,मुकुंद नाना सदाफळ,भाऊसाहेब जेजुरकर,दिलीप गाडेकर,रघुनाथ बोठे,अनिलशेठ पिपाडा,देविदास मते,संजय घाडगे,सोपान सदाफळ अदि मान्यवर उपस्थित होते.

“समताने सुधन गोल्ड लोन द्वारा सोनेतारण कर्ज वाटप करून नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असून अधिकाधिक सोनेतारण कर्ज वितरित करणार आहे.तसेच सुधन गोल्ड लोनने ही महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातही विविध पतसंस्थांच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज वाटप केले असून प्रामाणिकपणे सेवा देऊन इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांपेक्षा सोनेतारण कर्जदारांची १३० कोटी रुपयांची बचत केली आहे”-संदीप कोयटे,संचालक,समता नागरी सहकारी पतसंस्था, कोपरगाव.

    सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रास्तविक करताना चित्रफितीच्या माध्यमातून ‘समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम’ विषयी सविस्तर माहिती देऊन समताने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असल्याचे सांगत संस्था १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणार आहे.समताने सुधन गोल्ड लोन द्वारा सोनेतारण कर्ज वाटप करून नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असून अधिकाधिक सोनेतारण कर्ज वितरित करणार आहे.तसेच सुधन गोल्ड लोनने ही महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातही विविध पतसंस्थांच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज वाटप केले असून प्रामाणिकपणे सेवा देऊन इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांपेक्षा सोनेतारण कर्जदारांची १३० कोटी रुपयांची बचत केली असल्याची माहिती शेवटी केले आहे.

  दरम्यान राहाता व शिर्डी शाखेने केलेल्या ठेवी व छत्रपती संभाजीनगर व येवला शाखेने केलेल्या सोनेतारण कर्ज उद्दिष्टपूर्तीबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात उपस्थित प्रत्येक ग्राहकाचे समता महिला बचत गटाने तयार केलेला अगरबत्ती व कापूर एकत्र करून तयार केलेला गुच्छ देऊन स्वागत करत सत्कार करण्यात आला

   सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिन भट्टड यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार शाखाधिकारी मिलिंद बनकर यांनी मानले आहे.


   सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहाता शाखा शाखाधिकारी मिलिंद बनकर व शिर्डी शाखा शाखाधिकारी सतीश जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता व शिर्डी शाखेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांसह संस्थेच्या इतर शाखेतील शाखाधिकारी,अधिकारी,कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close