निवड
कुंभारी ग्रामपंचायत सदस्यपदी…यांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुंभारी गावातील ग्रामपंचायत सदस्यपदी कविता ललित नीलकंठ यांची निवड झाली आहे.त्यांचा सत्कार अ.नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते नुकताच झाला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत कविता ललित निळकंठ यांची बहुमतांनी निवड होऊन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अ.नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ कोपरगाव शहरातील ‘समता स्टडी पॉईंट’ अभ्यासिका उद्घाटन सोहळ्यानिमित्त आले असता त्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली होती.त्या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात कविता निळकंठ यांचा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार करण्यात आला.तसेच प्रांताअधिकारी माणिक आहिरे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचा सत्कार समता पतसंस्थेचे संचालक जितूभाई शहा यांनी केला.
या वेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे समन्वयक ओमप्रकाश कोयटे,प्रदीप साखरे,गोपीनाथ निळकंठ,संदीप कोयटे,गिरीश सोनेकर,ललित निळकंठ, सतीश निळकंठ,अमोल राजूरकर अशोक निळकंठ,अतुल निळकंठ,राहुल निळकंठ,प्रतिक निळकंठ,बबलू तळे, सुवर्णा निळकंठ आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अ.नगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा कोपरगाव तालुक्यातील वीरशैव लिंगायत व जंगम समाजाच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला.