जाहिरात-9423439946
संपादकीय

शहर विद्रुपीकरणाला चाप कोण लावणार ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   वर्तमानात कोपरगाव शहराचे मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून किळसवाणे विद्रुपीकरण सुरु असून त्यामुळे शहराचे वातावरण दूषित होत आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने आवाज उठवूनही अद्याप त्यावर कारवाई झालेली नसताना आज माहिती अधिकार संजय काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात आरती ओवाळून अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला असल्याने आता हे अधिकारी किती जागे होणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे मात्र नागरिकांनी स्वागत केले आहे.

  

फ्लेक्सद्वारे स्वस्तात आणि तुलनेने फुकट व सामाजिक कार्य असो किंवा नसो झटपट प्रसिद्धी या लोभामुळे सामाजिक संकेतस्थळ आणि फ्लेक्स याच्या प्रेमात कुठलेही काम नसलेले उडानटप्पू लवकर पडताना दिसतात.वर्तमानात हे अभद्र प्रदर्शन चौकाचौकात दिसत आहे.यात आता कमी की काय खिसे कापू आणि हद्दपार गुंडांचा समावेश असल्याचे दिसत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही हे विशेष !

निवडणुका,सण-उत्सव,वाढदिवस आदी काही कार्यक्रम आदींचे केवळ निमित्त हवे राजकीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या फ्लेक्सबाजीला उधाण येणे हा कायमचा व मोठा रोग निर्माण झाला आहे.त्याचा जनतेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून यावर आता नागरिक स्पष्ट बोलू लागले असून त्याचा जालीम उपाय शोधण्याची वेळ आली आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे.स्वस्तात आणि तुलनेने फुकट प्रसिद्धी व सामाजिक कार्य असो किंवा नसो झटपट प्रसिद्धी या लोभामुळे सामाजिक संकेतस्थळ आणि फ्लेक्स याच्या प्रेमात कुठलेही काम नसलेले उडानटप्पू लवकर पडताना दिसतात.वर्तमानात हे अभद्र प्रदर्शन चौकाचौकात दिसत आहे.यात आता कमी की काय खिसे कापू आणि हद्दपार गुंडांचा समावेश असल्याचे दिसत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही हे विशेष ! कोणतेही सामाजिक काम नसताना हि मंडळी एका रात्रीत समाजसेवक,धर्मवीर,स्वच्छतादूत,जलदुत,जलनायक,अमुक नेते,तमुक नेते आदी उपाध्या घेऊन मिरवताना दिसत आहे.मागे काही वर्षांपूर्वी एका मंत्र्यांचे शिर्डी पासून बाभळेश्वरपर्यँत बॅनर एका हद्दपार गुंडाने लावले असता त्याला त्याच रात्री ए.टी.एस.ने अटक केली होती.त्यावेळी या नेत्याचे हे प्लेक्स काढताना मोठे हाल झाले होते.आता तर शिक्षण संस्था,कोचिंग क्लासेस,व्यापारी,आर्थिक संस्था,धार्मिक संस्थाने,नवउद्योजक,सहकारी साखर कारखानदारही या फ्लेक्सच्या प्रेमात पडताना दिसत आहे.

दरम्यान काही वर्षांपूर्वी एका मंत्र्यांचे शिर्डी पासून बाभळेश्वरपर्यँत बॅनर एका हद्दपार गुंडाने लावले असता त्याला त्याच रात्री ए.टी.एस.ने अटक केली होती.त्यावेळी या नेत्याचे हे प्लेक्स काढताना मोठे हाल झाले होते.आता तर सहकारी साखर कारखानदारही या फ्लेक्सच्या प्रेमात पडताना दिसत आहे.

यात मुख्यउत्सव मूर्तीचे फोटो लहान आणि या बदफैलींचे फोटो मोठे हे चित्र आता सार्वत्रिक व अनेकांना सवयीचे झाले आहे.यात विशेष म्हणजे आपल्या नेत्याचे फोटो लावताना बऱ्याच वेळा कार्यकर्ते स्वतःच्या कष्टार्जित संपत्तीतून हा खर्च भागवताना दिसत होते.आता मात्र नेत्यांनी तीही सोय ठेवलेली नाही कारण काय तर कार्यकर्ते आपले फोटो लहान छापतात असा यांचा आरोप आहे.त्यामुळे किरकोळ खर्चात मोठी प्रसिद्धी असल्याने आता नेत्यांनी कार्यकर्त्यांचे हे झंझट संपवून टाकले असून आता हा ठेका आपल्या प्रसिद्धी विभागातील स्वीय सहाय्यकांकडे दिला आहे.बऱ्याच वेळा नेता हा मुंबई-दिल्लीत मंत्र्यांची भेट घेत असताना शहरात इकडे कामे मंजुरीची,तत्वतः,आर्थिक,प्रशासकीय मान्यतेच्या मंजुरीची फ्लेक्स लागल्याची उदाहरणे आहेत.बऱ्याच वेळा या फ्लेक्समुळे तरुण मुले आणि लहान बालकांचे या गुलछबू नेत्यांच्या छ्ब्यांकडे पाहताना अपघात होत आहे.तर अनेक वेळा सदर फ्लेक्स हे वाऱ्यावादळाने अंगावर पडल्याचे व दुर्घटना झाल्याच्या घटना घडल्या आहेत याला जबाबदार कोण ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.यावर राजकीय पक्षाचे लाभार्थी कार्यकर्ते,नगरसेवक,स्वार्थी समाजसेवक बोलण्याचे नाव घेत नाही त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान नगराध्यक्षपदी विजय वहाडणे यांची सात वर्षांपूर्वी निवड झाल्यावर त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही फ्लेक्स लावला नव्हता व राष्ट्रीय सणाला स्वतः कुठलेही झेंडावंदन करून मिरवले नव्हते.उलट स्वच्छता कर्मचारी व तत्सम कर्मचाऱ्यांना ते सन्मान देत असत.त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.या पासून हे नेते काही बोध घेणार आहे की नाही ?


   दरम्यान नगराध्यक्षपदी विजय वहाडणे यांची सात वर्षांपूर्वी निवड झाल्यावर त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही  फ्लेक्स लावला नव्हता व राष्ट्रीय सणाला स्वतः कुठलेही झेंडावंदन करून मिरवले नव्हते.उलट स्वच्छता कर्मचारी व तत्सम कर्मचाऱ्यांना ते सन्मान देत असत.त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.त्यांनी सुरुवातीस यास एक ठराव घेऊन त्याला विशिष्ट रक्कम भरून परवानगी सक्तीची केली होती व त्या फ्लेक्सवर पावती बंधनकारक केली होती.त्यामुळे त्या अपप्रवृत्तीला बऱ्यापैकी आळा बसला होता.मात्र दोन वर्षांपासून त्याचा कालावधी संपल्याने त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर कानाडोळा केला आहे आणि नेत्यांची चांगलीच सोय करून दिली असून हि फ्लेक्सबाजी प्रचंड बोकाळली आहे.सदर नेत्यांनी कोपरगाव शहर खराब करण्याचा ठेका घेतला का ? व त्यांना मतदारांनी यासाठी निवडून दिले का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

बऱ्याच वेळा हे फ्लेक्स हे देवादिकांचे असतात मात्र ते वेळेवर जर काढलें नाही तर त्याची विटंबना होऊ शकते याचे भान अनेकांना दिसत नाही.भटकंती कुत्री व तत्सम प्राणी त्यावर लघुशंका करू शकतात.अनेक फ्लेक्स वर नेत्यांचे फोटो मोठे आणि देवादिकांचे फोटो उगीच किड्यामुंगी प्रमाणे दिसत असून आपल्या आराध्यांची अशी टिंगल करणे या भ्रष्टाचारी नेत्याना आणि कार्यकर्त्याना शोभते का ? असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.शहरात एका पक्षाकडून स्रेयवादासाठी फ्लेक्स लागले का दुसरा पक्ष लगेच आपले फ्लेक्स झळकवतो तिसरा त्यांचे खण्डन करताना दिसतो यात शहराचे आपण कचऱ्यात रूपांतरण करतो याचे या मंडळींना भान रहात नाही.प्रभू श्रीराम मंदिराचे उदघाटन संपन्न होऊन दोन तीन दिवस झाले आहे.तरीही अद्याप ते फ्लेक्स,कमानी झळकताना दिसत आहे.या बाबत जबाबदार नगरपरिषद अधिकारी काय करत आहे असा सवाल निर्माण झाला आहे.आता शहरात केवळ कुत्र्यामांजराचे फ्लेक्स लागण्याचे केवळ बाकी आहे.मागे काही उत्साही मंडळींनी या विद्रुपी करणाकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ तोही प्रयोग करून लक्ष वेधून घेतले होते.तरीही या निर्लज्ज कार्यकर्त्याना त्याचे काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.यात विद्रुपीकरणात काही पत्रकारही सामील होतात हे आणखी एक विशेष !

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी आज सकाळी अकरा वाजता कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात या अवैध फ्लेक्सबाजी विरुद्ध आरती ओवाळून अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला तो क्षण.

 

मागे काही वर्षांपूर्वी या प्रकरणी मुंबई आणि पुण्यात उच्च न्यायालयाने या अनिष्ट प्रथांवर बंदी घातली होती.त्यामुळे तेथे बऱ्यापैकी आळा बसला होता.व पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली होती.असाच प्रयोग करण्याची वेळ शिर्डी,कोपरगाव,राहाता,आदी उत्तर नगर जिल्ह्यात आली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close