जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात भारत संकल्प यात्रेचे स्वागत

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज दि.२६ डिसेंबर रोजी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने फ्लॅग शिप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले होते त्याचे नागरिकांनी उस्फुर्त स्वागत केले असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे.

 

“कोपरगाव शहरातील वंचित पात्र लाभार्थ्यांनी सदर संकल्प यात्रेत केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व सदर यात्रेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे.आयुष्मान भारत,उज्ज्वला योजना,पी.एम सुरक्षा विमा, पी.एम.स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम दि.२६ व २७ डिसेंबर रोजी कोपरगाव शहरात मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय मैदान या ठिकाणी राबवण्यात आला आहे.तर बुधवार दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तुळजा भवानी मंदिर परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न होत आहे.


   दरम्यान आज मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे रथाचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन केले आहे.याप्रसंगी बचत गटातील महिलांनीं या रथाचे विधिवत पूजन केले आहे.रथासोबत असलेल्या कर्मचारी यांचे आ.काळे,मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी,उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

   याप्रसंगी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील सारेगम लिटील चॅम्प कु.गौरी अलका पगारे हिचा नगर परिषदेतर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी आ. काळे हे सदर प्रसंगी बोलताना म्हणाले की,”शहरातील वंचित पात्र लाभार्थ्यांनी सदर यात्रेत केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व सदर यात्रेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले आहे.

   सदर प्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीततेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोज पापडीवाल,अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close