जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

   …या जिल्हा परिषद उपमुख्याधिकारी यांची विकास कामांना भेट !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  

  कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत चांदेकासारे व डाऊच खुर्द ग्रामपंचायत येथे अचानक जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.त्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अ.नगर येथील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्याधिकारी दादासाहेब गुंजाळ यांचा नियोजित नाशिक दौरा होता त्यावेळी त्यांनी मुद्दाम वेळ काढून कोपरगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीना व त्यांच्या विकास कामांना भेटी दिल्या आहेत.त्यात चांदेकासारे व डाऊच खुर्द ग्रामपंचायत आदींचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी दादासाहेब गुंजाळ यांचा सत्कार करताना डाऊच खुर्दचे माजी सरपंच संजय गुंजाळ व सदस्य दिगंबर पवार दिसत आहे.

  

जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी डाऊच खुर्द येथील ग्रामपंचायत अंतर्गत जनसुविधा अंतर्गत इमारतीच्या कामास भेट दिली आहे.त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यावेळी माजी सरपंच संजय गुरसळ व सदस्य दिंगंबर पवार आदींनी त्यांचा सत्कार केला आहे.

सदर प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,चांदेकासारे सरपंच किरण होन,डाऊच खुर्द ग्रामपंचायत सरपंच नेहा गुरसळ,माजी सरपंच संजय गुरसळ,उपसरपंच रईसाबानू भैय्यासाहेब सय्यद,सदस्य दिगंबर पवार,दादाभाई सय्यद,बाळासाहेब गुरसळ,देवा पवार,चांदेकासारे ग्रामसेवक नाडेकर व डाऊच खुर्द ग्रामसेवक जालिंदर पाडेकर आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

   सदर प्रसंगी त्यांनी डाऊच खुर्द येथील ग्रामपंचायत अंतर्गत जनसुविधा अंतर्गत इमारतीच्या कामास भेट दिली आहे.त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यावेळी माजी सरपंच संजय गुरसळ व सदस्य दिंगंबर पवार आदींनी त्यांचा सत्कार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close