जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…यांची पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदी बढती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी असलेला तरुण दत्तात्रय भिकाजी थोरात यांची पंजाब मधील पंजाब नॅशनल बँकेच्या चंदिगड शाखेत शाखा व्यवस्थापक पदी बढती झाल्या बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सत्कार स्वीकारताना शाखा व्यवस्थापक दत्तात्रय थोरात दिसत आहे.

  

दत्तात्रय थोरात यांनीं प्रथम सन-२०१५-१६ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून श्रम शक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथे सेवा बजावली होती.त्यानंतर सन-२०१७ दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत कृषी अधिकारी म्हणून उदयपूर नियुक्ती झाली होती.त्यापश्चात त्यांची कृषी प्रबंधक म्हणून मोहाली पंजाब येथे नियुक्ती झाली होती.त्या सेवेची दखल घेऊन हि निवड झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,जवळके येथील भिकाजी थोरात यांचे तृतीय चिरंजीव दत्तात्रय थोरात यांचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बी.एस.सी पर्यंत शिक्षण हे राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठ व नाशिक येथील के.के.वाघ येथील महाविद्यालयात झाले आहे.तर पुढील एम.एस.सी.पर्यंत शिक्षण हे डॉ.पंजाबराव देशमुख अकोला विद्यापीठ येथे सन-२०१३ साली झाले असून त्यांनी सन-२०१५-१६ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून श्रम शक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथे सेवा बजावली होती.त्यांची सन-२०१७ दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत कृषी अधिकारी म्हणून उदयपूर नियुक्ती झाली होती.त्यानंतर त्यांची कृषी प्रबंधक म्हणून मोहाली पंजाब येथे नियुक्ती झाली होती.त्या सेवेची दखल घेऊन त्यांची नुकतीच पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदी बढती झाली आहे.

त्यांच्या निवडीचे महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,रावसाहेब थोरात,पप्पू थोरात,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,बाबासाहेब थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,नवनाथ थोरात,डी.के.थोरात,आण्णासाहेब भोसले,गोरक्षनाथ शिंदे,नवनाथ थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close