जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवास प्रारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०५ वा श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “श्री राम मंदीर ” हा भव्‍य देखावा व हैद्राबाद येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती रेणुका चौधरी यांच्‍या देणगीतून करण्‍यात आलेली आकर्षक फुलांची सजावटीने साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मंगळवार दि.२४ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे.या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती,श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक,पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान,सकाळी ०७ वाजता श्रींची पाद्यपूजा,सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम संपन्न होणार आहे.


उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.आरतीनंतर पहाटे ०५.४५ वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पोथी,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा आणि प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे व खरेदी विभागाचे प्र.अधिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी प्रतिमा घेवुन सहभाग घेतला.
   यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे,संरक्षण अधिकारी आणासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,पुजारी,कर्मचारी,साईभक्त आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.मिरवणूक व्‍दारकामाईत आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला.यावेळी संस्‍थानच्‍या तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ यांनी प्रथम,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी व्दितीय,प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे यांनी तृतीय,प्र.मुख्‍य रोखपाल विश्‍वनाथ बजाज यांनी चौथ्‍या व रुग्‍णालय विभागाचे उपवैद्यकिय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले.


सकाळी ०७. वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती झाली, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प. प्रभंजन भगत यांचे कीर्तन तर सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत नृत्‍यात्मि डान्‍स स्‍टुडिओ ऋतुजा आणि पल्‍लवी धनेश्‍वर,शिर्डी यांचा भरतनाट्यम हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्‍न होणार असुन, रात्रौ ०९.१५ वाजता गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. मिरवणूकीनंतर श्रींची शेजारती होईल. तर अखंड पारायणासाठी श्री व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्‍यात येणार आहे.

मंगळवार दि.२४ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे.या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती,श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक,पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान,सकाळी ०७ वाजता श्रींची पाद्यपूजा,सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम,सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. प्रभंजन भगत यांचा कीर्तनाचा कार्यक्रम श्रींचे समाधी मंदिराच्‍या उत्‍तर बाजुचे स्‍टेजवर होणार आहे. तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी मंदिराचे समोरील स्‍टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल.दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.शैलेंद्र भारती,मालाड (ई), मुंबई  यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे.

रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक २४ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close