जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

गौरव रंगभूमीचा कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर येथील कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांचे वतीने राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व कांकरिया करंडक रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रंगभूमीवर अ.नगर जिल्ह्यातील अविरत सेवा देणा-यांचा “गौरव रंगभूमीचा” या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांचा कला-नाट्य-सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदानाबद्दल जेष्ठ रंगकर्मी सदानंद भणगे,सेवा निवृत्त न्यायाधीश उमाभाभी बोरा यांचे शुभहस्ते मानाचा पंचा,सन्मानपत्र आणि पुस्तक भेट देऊन गौरवण्यात आले आहे.

या प्रसंगी समाजसेविका व कांकरिया करंडकच्या प्रमुख डॉ.सुधा कांकरिया,प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया,बालरंगभूमी परिषदेच्या उर्मिला लोटके,रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर,कांकरिया करंडकचे सदाशिव मोहिते,उमाकांत जांभळे यांचे सह कला व नाट्य क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close