जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखान्याचा तोटा २७ कोटीवरून ११० कोटींवर कसा गेला-..या शेतकरी नेत्यांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


अ.नगर जिल्ह्यातील नेते सहकारी संस्था एकमेकांत वाटून खाण्यात समाधान मानतात ही कुप्रथा निर्माण झाली असून प्रवरेच्या माध्यमातून गणेश सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २७ कोटीं वरून ११० वर नेऊन घातला असून इतर देणी धरून तो ३७५ कोटींवर पोहचला आहे.हाच तो विखे पॅटर्न आहे काय ? असा कडवा सवाल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी राहाता येथील एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना केला आहे.

“गणेशच्या ज्या शेतकऱ्यांनी व कामगारांनी हा कारखाना सक्षम करण्यासाठी स्वतःचे रक्त आठवले त्यांना औषधाला पैसे देऊ शकत नाही या व्यवस्थेला शेतकरी संघटना आव्हान दिल्या शिवाय राहणार नाही.ज्यांनी हा कारखाना मोडकळीस आणला आहे.भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन यामुळे या कारखान्याची वाट लावली आहे.त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी सभासदांना आता पेटून उठावे लागेल”-ऍड.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्यातील सहकारी संस्थांच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राज्यातील २० हजार ६४२ सहकारी संस्थांच्या निडणुकांचा धडाका सुरु होत आहे.त्यासाठी ०१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील पात्र कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२३ पासून ते ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त यांनी दिले आहेत.त्यामुळे राज्यातील सर्वच सहकारी संस्थांचे नेते आणि कार्यकर्ते कामास लागले आहेत.त्याला गणेश सहकारी साखर कारखाना आणि या कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि सभासद अपवाद नाही.गत सन-२००६ व २०१६ च्या निवडणुकीत डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या पॅनेलने विखे विरोधात पॅनल देऊन त्यांना मोठी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता.या वर्षी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी मोठा प्रतिसाद दिल्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यांनी या वेळी गणेश सहकारी साखर कारखान्यात आपले भविष्य आजमविण्याचे ठरवलेले दिसत आहे.त्यासाठी सभासदांनी त्यांना आग्रह केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यानुसार त्यांनी राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान येथील सभागृहात शेतकऱ्याची बैठक शनिवार दि.१५ एप्रिल रोजी बैठक घेतल्यानंतर आज राहाता शहरात एकनाथ मंगल कार्यालयात आज एक जागृती सभेचे आयोजन केले होते त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,जेष्ठ नेते जनार्दन घोगरे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,अमूतराव धुमाळ,अजित कदम,गणेशचे माजी संचालक शिवाजी लहारे,युवराज जगताप,विलास कदम,श्रीकांत मापारी,कामगार नेते रमेश देशमुख,किसनराव कोते,बाबा पगार,अण्णासाहेब सातव,अण्णासाहेब तुरकणे,प्रभाकर धनवटे,गीताराम शेलार,दिलीप जाधव,रामकृष्ण बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,अजित कदम,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,शिवाजी लहारे,श्रीकांत मापारी,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रस्थापितांच्या ताब्यात सहकारी संस्था असताना त्या तोट्यात कशा जातात याचा विचार करण्याची गरज आहे.शेतकरी संघटना जेथे जेथे शेतकरी कामगार यांच्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जाणार आहे.जिल्ह्यात एकमेकात सहकारी संस्था वाटून खाण्यात समाधान मानले जात आहे.प्रवरेच्या माध्यमातून ८७ कोटींचा ११० तोटा तो विक्रमी तोट्यात घातला आहे.व इतर देणी धरून ३७५ कोटी देणे आहे. जो विखे कारखाना ८७५ कोटींनी तोट्यात त्यांना गणेश सहकारी साखर कारखाना चालविण्यास दिलाच कसा ? दिला तर तो तोट्यात कसा गेला असा थेट सवाल त्यांनी केला आहे.ज्या शेतकऱ्यांनी व कामगारांनी हा कारखाना सक्षम करण्यासाठी स्वतःचे रक्त आठवले त्यांना औषधाला पैसे देऊ शकत नाही
या व्यवस्थेला आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.कारखाना मोडकळीस आणला आहे.हे कारखाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन यामुळे पोखरले आहे.त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी आता पेटून उठावे लागेल.तरच शेतकरी वाचू शकेल कामगार टिकू शकेल याचा विचार सभासदांना करावा लागेल.आम्हाला कोणाची भीती वाटत नाही.पैशाने मत विकणे म्हणजे तुम्ही तुमचे सरण स्वतःच्या हाताने तयार करणे होय.याचा विचार सभासदांना गांभीर्याने करावा लागेल.तुमच्या नादाणीमुळे तुम्हाला उसाचा दर ३५० टणाला कमी घ्यावे लागले आहे.तुम्ही स्वतःच्या भावाला रुपया सोडत नाही आणि चोरांना लाखो-कोटी रुपये सोडून या भ्रष्ट व्यवस्थेला का पोसत आहेत.तुमच्या हातात न्यायालयाचे निकाल हाती आहेत.तुम्ही या भ्रष्ट व्यवस्थेच्या संचालकांची तुम्ही जप्ती करू शकता.म्हणून तुम्हाला शक्ती देण्यासाठी शेतकरी संघटना पुढे येत आहे.तुम्ही या अन्याया विरोधात पुढे आले नाही तर त्याची किंमत मोजावी लागेल.
आपण अगस्ती कारखान्यात ७५ कोटींचा घोटाळा उघड केला आहे.राहुरीचे संचालक मंडळ हलवले,मुळा-प्रवरा वीज वितरण कंपनीवर प्रशासक आणले आहे.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे रक्कम द्यायला लावली आहे.निवडणूक आल्यावर हे प्रश्न समाजासमोर आणणार आहे.त्यावेळी उपस्थितांना तुम्ही या लढाईला पाठिंबा देणार का असा सवाल त्यांनी विचारून हात वर करण्यास प्रोत्साहन देण्यास सांगितले त्यावेळी उपस्थितांनी त्यास घोषणा देऊन पाठिंबा दिला आहे.आम्ही श्रीरामपुरात सभासद होण्यास अर्ज केला तर लगेच मंजूर केला हे कशाचे द्योतक आहे.आमच्याकडे एक संस्था असून त्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी ४०-४५ टक्के मते श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीत सभासदांनी दिले आहे.याता आगामी गणेश कारखाना निवडणुकीत तुम्हाला पाठीशी उभे राहावे लागेल असे आवाहन ऍड.अजित काळे यांनी उपस्थितांना शेवटी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक कामगार नेते रमेश देशमुख यांनी केले,तर सूत्रसंचालन नारायण भुजबळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष सांबारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close