जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

परदेशात अभ्यासलेले एक दुर्मिळ संत-महिपती महाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

मुळ पुण्यातील मात्र आता अमेरिकेतील कोलंबिया येथे स्थायिक होऊन तेथील विद्यापीठात पी.एच.डी.करत असलेल्या विद्यार्थिनी रोहिणी शुक्ल यांनी दि.१४ डिसेंबर रोजी संशोधन करण्यासाठी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट येथे भेट दिली असून त्या गेल्या चार वर्षांपासून त्या महिपती महाराज (१७१५-१७९०) यांचे लेखन,कीर्तन,कार्य,आणि सामाजिक इतिहासाचा अभ्यास करत आहे.त्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहिणी शुक्ल या मुळ पुण्यातील असून त्यांचे कुटूंब आता अमेरिकेत स्थायिक आहे.त्यांनी बी.ए.तत्त्वज्ञान,फर्गुसन कॉलेज,पुणे येथे केले असून एम.ए.तत्त्वज्ञान,मनीपाल विद्यापीठ (मनीपाल,कर्नाटक) येथे केले आहे,या शिवाय एम.ए.रिलिजिअस स्टडिज,कोलंबिया विद्यापीठ (न्यूयॉर्क,अमेरिका) पी.एच.डी.रिलिजिअस स्टडिज,कोलंबिया विद्यापीठ (न्यूयॉर्क,अमेरिका)येथे करत असून त्यांनी आता महिपती महाराज यांचे परदेशातील साहित्य शोधन सुरु केले आहे.हि राहुरीकरांसाठी खूपच प्रेरणादायी बाब मानली पाहिजे.त्यांचा ताहाराबाद येथील महिपती महाराज संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांच्या वतीने सौ.आशा सूर्यवंशी यांनी सत्कार केला आहे.

संत महिपती (ताहराबादकर,राहुरी) (अंदाजे शा.श. १६३७/इ.स.-१७१५-श्रावण कृष्ण द्वादशी,शा.श. १७१२/ इ.स.-१७९०) हे महाराष्ट्रातील अ.नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते.त्यांनी १७ व्या ते १८ व्या शतका दरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संता बाबतचे चरित्रलेखन केले आहे त्यामुळे अनेक संत परंपरेतील महान विभूती राज्याला ज्ञात झाल्या आहेत.त्यांचे उपकार राज्यातील संत परंपरेला कधीही विसरता येणार नाही त्यांचे साहित्य आणि कीर्ती हि भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात माहिती होती पण ती विदेशातही विसाव्या शतकात पोहचली होती ते या निमित्ताने उघड झाले असून याचा अभ्यास करण्यासाठी नवीन पिढी सक्रिय झाली आहे हे विशेष आक्रीत मानले पाहिजे त्यातील रोहिणी शुक्ल यांचे नाव आगामी काळात अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

अमेरिकेतील संत साहित्याच्या अभ्यासक रोहिणी शुक्ल यांचा श्री क्षेत्र ताहाराबाद येथे संस्थानच्या वतीने सत्कार करताना सौ.आशा सूर्यवंशी या दिसत आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महिपती हे एक विपुल भक्त चरित्रकार होते त्यांची सखोल भक्ती,भूतकाळ,भक्ती,सामाजिकता आणि वारकरी समुदायाची निर्मिती समजून घेण्यासाठी ते एक प्रमुख स्त्रोत असल्याचे मानले जाते.गाव-कुलकर्णी म्हणून काम सोडून दिल्यानंतर त्यांनी ‘भक्तविजय'(१७६२),’संत विजय’ (१७९०),’भक्तलीलामृत’ (१७७४),’संतलीलामृत’,(१७६७) आणि इतर अनेक ग्रंथ लिहिले आहेत.महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या राष्ट्रवादी विचारवंतांसाठी ‘भक्तविजय’ विशेष महत्त्वाचा होता.मुख्य म्हणजे महिपतीच्या मृत्यूनंतर २५ वर्षांच्या आत इंग्रजी साहित्यात संत महिपती महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

त्यावेळी स्कॉटिश मिशनरी सोसायटीने १८२३ मध्ये रेव्हरंड जॉन स्टीव्हनसन (१७९८-१८५८) यांना मुंबईला पाठवले होते.त्यांनी १८४१ मध्ये,’रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यवाहीमध्ये ‘भक्तविजया’ची ओळख करून देणारे सादरीकरण केले आणि १८४३ मध्ये निबंधाच्या रूपात प्रकाशित केले.निबंधाचे शीर्षक आहे ‘अँन अकाउंट ऑफ द बौद्ध-वैष्णव आणि विठ्ठल भक्त ऑफ दख्खन’ त्यांच्या निबंधात ‘भक्तविजय’चे पहिले अनुवादित उतारे समाविष्ट असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शुक्ल यांनी दिली आहे.

रेव्हरंड मरे मिशेल (१८१५-१९०४), फ्री चर्च ऑफ स्कॉटलंडचे,स्टीव्हनसनचे समकालीन,यांनी भक्तलिलामृत ग्रंथावर लक्ष केंद्रित केले.भक्तलिलामृत मुख्यतः संत-कवी तुकारामांबद्दल आहे.१८४९मध्ये ‘द स्टोरी ऑफ तुकाराम’ नावाच्या निबंधात मिशेल यांनी,’भक्त लिलामृता’चे पहिले भाषांतरित उतारे दिले आहेत.

रॉयल एशियाटिक सोसायटीज आणि जोसेफ हेलिओडोर सेगेसे व्हर्टू गार्सिन द टॅसी (१७९४-१८७८) नावाच्या मार्सेल,फ्रान्स,मधील विद्वानांतील विविध संबंधांद्वारे,महिपतीची ओळख फ्रेंच साहित्यात झाली.टॅसी हे हिंदी,उर्दू,पर्शियन,तुर्की आणि अरबी साहित्याचे विद्वान होते आणि त्यांनी त्यांच्या Histoire de la Littérature Hindouie et Hindoustanie (History of the Literature of Hindustani) च्या दुसऱ्या खंडात महिपतीवर एक नोंद प्रकाशित केली.हा प्रचंड प्रकल्प, विविध लेखकांच्या आणि त्यांच्या कामांच्या ६०० हून अधिक परिचयांसह,प्रथम १८४६ मध्ये प्रकाशित झाला.१८७० आणि १८७१ मध्ये तिसऱ्या खंडासह तो पुन्हा प्रकाशित झाला असल्याची माहिती रोहिणी शुक्ल यांनी उघड केली आहे.

सन-१९१०मध्ये दोन महत्त्वाची भाषांतरे प्रकाशित झाली-एच.डब्ल्यू.बेल यांचे १९१३ मधील,’सम ट्रान्सलेट फ्रॉम द मराठी पोयट’ इंग्रजी-मराठी आणि १९१९ मध्ये सी.ए.किनकेड यांचे टेल्स ऑफ द संत ऑफ पंढरपूर दोन्ही भाषांतरे महाराष्ट्राच्या शैक्षणिक सेवांशी निगडीत आहेत.

अमेरिकन मराठी मिशनने लोकप्रिय मराठी ग्रंथ आणि मौखिक परंपरांच्या अनुवादाद्वारे मराठी भाषिकांना इंग्रजी कसे वाचावे आणि कसे लिहावे हे शिकवण्याचा प्रकल्प उत्साहाने हाती घेतला.जस्टिन ऍबॉट हे १८४२ मध्ये सुरू झालेल्या ‘ज्ञानोदय’ नावाच्या द्विभाषिक आणि द्वि-साप्ताहिक नियतकालिकाचे इंग्रजी संपादक होते,जेथे १८८५ ते १९१० या काळात महिपतीच्या काही ग्रंथांचे इंग्रजी उतारे दिसले.

मराठी साहित्यिक इतिहासकार र.चि.ढेरे जस्टिन ई.ऍबॉट (१८५३-१९३२) यांना “महिपतीचा विदेशी भक्त” असे संबोधतात.ऍबॉटचा जन्म न्यू हॅम्पशायर येथे एका अमेरिकन मंडळीवादी (Congregationalist) मिशनरीच्या पोटी झाला.सन-१८५७ मध्ये ते भारतात आले जेव्हा त्यांचे वडील राहुरी येथील अमेरिकन मराठी मिशनमध्ये तैनात होते.ऍबॉट यांनी एकवीस वर्षे मिशनरी म्हणून काम केले.त्यांनी बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आणि १९२० च्या दशकात महिपतीच्या ग्रंथावर संशोधन करण्यास सुरुवात केली.’द पोयट संत ऑफ महाराष्ट्र’ या बारा खंडांच्या पुस्तक मालिकेचे संपादक आणि तुकारामांचे प्रस्थापित अभ्यासक जे.एफ.एडवर्ड्स नोंदवतात की,“महाराष्ट्राचा एक निष्ठावंत सुपुत्र या नात्याने त्यांनी अनुवाद हाती घेतला होता” मात्र दीर्घ आजारामुळे,ऍबॉट न्यूजर्सी येथे गेले आणि १९११ ते १९३२ पर्यंत तेथे राहिले.या वर्षांमध्ये,ऍबॉटने नरहर गोडबोले यांच्याशी पत्रव्यवहार करून महिपतीच्या अनुवादाची अंतिम हस्तलिखिते पूर्ण केली.’भक्तविजय’ तीन स्वतंत्र खंडांमध्ये प्रकाशित केले गेले.अध्याय ४२ आणि ४३ ‘भानुदास’ (१९२६) म्हणून आणि उर्वरित प्रकरणे ‘स्टोरी ऑफ इंडियन संत’ खंड-१ (१९३३) आणि खंड-२ (१९३४) म्हणून प्रकाशित केली गेली.भक्तलिलामृत असेच चार स्वतंत्र खंडांमध्ये प्रकाशित झाले होते,त्यातील पहिले तीन प्रत्येकी एका संत-कवीच्या कथांवर केंद्रित आहेत-‘एकनाथ’ (१९२७),’देसोपंत’ (१९२८),’तुकाराम’ (१९३०)-आणि नंतर,’नेक्टर फ्रॉम इंडियन संत’ (१९३५).’रामदास’वर लक्ष केंद्रित करणारा,’संतविजय’ हा ‘रामदास'(१९३२) या एका खंडात प्रकाशित झाला आणि पांडुरंग स्तोत्र (१९२९) नावाच्या ग्रंथात प्रकाशित झाले असल्याची माहिती.शुक्ल यांनी दिली आहे.त्यामुळे परदेशात पोहचणारे महाराष्ट्राचे,’एक दुर्मिळ संत’ म्हणून संत महिपती महाराज यांची ओळख निर्माण होईल हे नक्की!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close