जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

…तर मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल-आव्हान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मराठी माणसाला एकत्र येऊन आपल्या भाषेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल,त्याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणार नाही असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी नुकतेच कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“मराठी भाषेला मागील २५०० वर्षांचा इतिहास आहे.त्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या भाषा सल्लागार समितीने अविश्रांत परिश्रम घेऊन पुराव्यासह अहवाल सादर करून ४ वर्षे होऊन गेली.यावर्षी तरी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल अशी आशा जागतिक मराठी भाषा गौरवादिनी होती.महाराष्ट्र शासनानेही त्यासाठी पुनः पुन्हा प्रयत्नही केले.मात्र अद्यापही त्याची घोषणा झाली नाही”-संदीप रोहमारे,विश्वस्त,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स.२०१३ रोजी घेण्यात आला आहे.या दिनानिमित्त कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयत मराठी भाषादिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून शिवचारित्रकार गौरव पवार हे उपस्थित होते.

सदर प्रसंगी प्रा.व्ही.पी.लंगोटे व प्रा.पी.एल.साळवे यांनी केले होते.कार्यक्रमास सिनेट सदस्य प्रा.डॉ.के.एल. गिरमकर महाविद्यालयातील बहुसंख्या प्राध्यापक व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवचरित्रकार गौरव पवार यांनी आरंभी ज्यांच्या जयंतीनिमित्त हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो,त्या वि.वि.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये व थोरवी सांगून नंतर शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग आपल्या ओघवत्या शैलीत कथन केले.त्यामुळे संपूर्ण सभागृहातील श्रोत्यांमध्ये वीरश्रीचा संचार झाला.या कार्यक्रमातच १४ ते २८ जानेवारी याकाळात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त मराठी विभागातर्फे ‘स्वातंत्र्यानंतरचा भारत’ ‘मला भावलेले स्वातंत्र्य सैनिक’ भारतीय राज्यघेटनेत झालेले बदल,’मला आवडलेले देशभक्तीपर गीत’ ‘राजभाषा मराठी: संरक्षण व संवर्धन’ ‘अमृत महोत्सवी भारत व आजचा तरूण’ ‘कोरोना व ठप्प मानवी जीवन’ वगैरे विषयावर निबंध, काव्यलेखन, प्रश्नमंजूषा व मराठी म्हणी व बाक्प्रचार स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.
ते पुढीलप्रमाणे.

१. प्रश्नमंजूषा स्पर्धा : प्रथम क्रमांक पवार निकिता दादासाहेब (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक लासूरे प्रियंका राजेंद्र (प्रथम वर्ष वाणिज्य), तृतीय क्रमांक- औताडे आदित्य दत्तू (प्रथम वर्ष वाणिज्य).
२. काव्यलेखन स्पर्धा : प्रथम क्रमांक देशमुख आदिती अशोकराव (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक- पठाण साबिया गफ्फार (द्वितीय वर्ष वाणिज्य), तृतीय क्रमांक- डुबे वृषाली अर्जुन (द्वितीय वर्ष विज्ञान)
३. म्हणी व वाक्प्रचार स्पर्धा: प्रथम क्रमांक मुळे योगेंद्र निलेश (द्वितीय वर्ष विज्ञान), द्वितीय क्रमांक कुलकर्णी धनश्री संतोष (तृतीय वर्ष कला), तृतीय क्रमांक- परजणे स्वाती राजेंद्र (तृतीय वर्ष बी.बी.ए)
४. निबंध स्पर्धा : प्रथम क्रमांक- दिवटे गोरी अजय (द्वितीय वर्ष कला), द्वितीय क्रमांक- मुळे योगेंद्र निलेश (द्वितीय वर्ष विज्ञान), तृतीय क्रमांक- आभाळे पूजा सुनील (प्रथम वर्ष विज्ञान)

वरील पारितोषिक प्राप्त विद्याथ्यांना प्रमुख पाहुणे गौरव पवार यांच्या शुभहस्ते ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन मराठी भाषा गोरव दिनी गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या आरंभी कर्तृत्ववान मराठी माणसे व लेखक यांच्यावर आधारीत चल चित्रफीत दाखविण्यात आली व कु.देशमुख आरती हिने ‘सुवर्ण महोत्सवी भारत’ या विषयावर कविता सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश देशमुख यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले आहे.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.ए.एफ.सुर्यवंशी व प्रा.डॉ.एस.के.बनसोडे यांनी केले आहे.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.व्ही.पी.लंगोटे यांनी तर शेवटी उपस्थितांनाचे आभार प्रा.पी.एल.साळवे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close