जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील…या बँकेच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगार वाढ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारात बँकेत अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पीपल्स बँकेने बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगार वाढ देण्याचा करार अहमदनगर जिल्हा बँक कर्मचारी युनियन व पीपल्स बँक यांच्यामध्ये २९ मार्च रोजी करण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी दिली आहे.

“कोपरगाव पीपल्स बँकेच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ देणारी नगर जिल्ह्यातील एकमेव बँक असल्याचे कौतुक करून त्यांनी आगामी काळात नवीन खातेदार व कर्जदार आणावे व व्यवसाय वृद्धी करावा”-कैलास ठोळे,जेष्ठ संचालक,कोपरगाव पीपल्स बँक.

सदर प्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक कैलास ठोळे,धरमकुमार बागरेचा,सूनील बंब,सुनील कंगले,कल्पेश शहा,विधीज्ञ संजय भोकरे व बँकेचे महाव्यवस्थापक दीपक एकबोटे व अहमदनगर जिल्हा युनियनचे सहसचिव प्रदीप नवले तसेच बँकेचे सेवक प्रतिनिधी वीरेश पैठणकर,अशोक पापडीवाल व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या वतीने बँकेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला आहे.सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी,”वार्तमानात बाजारातील आर्थिक परिस्थिती व बँकिंग क्षेत्रातील स्पर्धात्मक परिस्थिती याची माहिती कर्मचाऱ्यांना अवगत करून दिली व आपल्या बँकेची प्रगती करण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले व कर्मचाऱ्यांना बाबत बँकेचे व्यवस्थापन नेहमीच सकारात्मक राहिले असल्याचे शेवटी सांगितले आहे.

या करार स्थापने साठी जिल्हा कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष धनंजय भंडारे,सचिव एम.यु. कुलकर्णी,सहसचिव प्रदीप नवले,बँकेचे महाव्यवस्थापक एकबोटे,सहाय्यक व्यवस्थापक श्री छाजेड,सेवक संचालक पैठणकर,पापडीवाल व संचालक डॉ. विजय कोठारी,रवींद्र ठोळे व सर्व संचालकांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close