जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगावात कर्मवीर काळे या कारखान्याने उसाला दिला…इतका भाव,सभासदांत नाराजी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

मागील हंगामातील ऊसास दर वाढ प्रति टन ५० व सन-२०१०-११ मध्ये कपात केलेली पूर्व हंगामी प्रती.मे.टन ५० रुपये ठेव
सर्व मिळून २ हजार ६५० देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.यावर शेतकऱ्यांची सभागृहात मोठी चलबिचल झाली त्यावेळी त्यांनी त्याचा वेध घेत कारखान्याचे नूतनिकरणाचे काम सुरू असल्याने जास्त देण्यास असमर्थता दर्शवली आहे.त्यामुळे सभासदांत नाराजी दिसून आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेला कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी २ वाजता संपन्न झाली त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

कर्मवीर काळे सहकारी  कारखाना कार्यक्षेत्रात आडसाली विक्रमी ऊस उत्पादन करणारे शेतकरी प्रल्हाद धसे,(दहिवाडी) तुषार बाबुराव बारहाते,संवत्सर,राजेंद्र अशोकराव खिलारी,(सुरू)ब्राम्हणगाव,धनंजय नानासाहेब चव्हाण (खोडवा),आदिंचा सत्कार करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे, जेष्ठ माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी,नारायण मांजरे,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,बाळासाहेब कदम,कारभारी आगवन,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,उपाध्यक्ष ,माजी संचालक बाबूराव कोल्हे,राजेंद्र खिलारी,कोपरगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,काकासाहेब जावळे,दिनार कुदळे,सचिन रोहमारे,राहुल रोहमारे,सुधाकर रोहोम,डॉ.बर्डे,आंनदराव चव्हाण,प्रवीण शिंदे,राजेंद्र गिरमे,सचिन चांदगुडे,सूर्यभान कोळपे,आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भविष्यात आपले नूतन संचालक मंडळ नक्कीच मागील संचालक मंडळासारखे काम करू असे आश्वसित केले व मागील गळीत हंगामाचा आढावा घेतला २१३ दिवस हंगाम चालला असून यात उचांकी ७.७३ टन गाळप केले तर साखर पोते ८ लाख उत्पादन केले आहे.

राज्यात १३२१ लाख टन ऊस गाळप झाले असल्याने आपले राज्य देशात पहिले तर जगात तिसरे आले आहे.यावर्षी २५२१.१२ रुपये येते.तर राज्याने २५०० एफ.आर,पी.निर्धारण केले होते.त्याप्रमाणे दर दिला आहे.ऊस तोडणी आणि वाहतुक यावर पंधरा दिवसात देयके दिले होते.७८.८८ एफ.आर.पी पेक्षा जास्त दर दिला असल्याचा दावा केला आहे.साखरेचा एम.एस.पी.३१०० होती ती आता ३६००-३७०० करायला हवी अशी मागणी त्यानी केली आहे.सभासदांना स्वस्त साखर देतो त्यावर आयकर सरकार भरायला लावला हे खेदजनक आहे.सन-२०१५ ची माफ केला हा एवढा अपवाद असल्याचे सांगितले आहे.सरकारने हा आयकर माफ करावा अशी मागणी केली आहे.केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण व वितरण मंत्रालयाने गाळप हंगाम २०२२-२३ साठी एफआरपी मध्ये प्रति मे.टन रु.१५० वाढ करून १०.२५ टक्के उताऱ्याला ३०५० रु.प्रति मे.टन दर जाहीर केला असल्याचे सांगितले आहे.

सरकारने साखर निर्यातीला अनुदान देण्याचे जाहीर केले होते.मात्र ब्राझील मध्ये साखर कमी उत्पादन झाल्याने दर वाढ चांगली झाली आहे.देशातून ११० लाख टन निर्यात केली आहे.खुले परवाना धोरण बदलले व संकुचित केल्याने अडथळा आला असल्याचा दावा केला आहे.त्यातून कच्ची साखर निर्माण झाली आहे.मात्र साठवणुकीला अडचण येत असून साखर खुली केल्याने त्याचा फायदा झाला आहे.एकट्या आपल्या राज्यातून ६८ लाख टन निर्यात करू शकलो आहे.कर्मवीर काळे कारखान्यास सन-२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा ३.४० कोटी झाला असून ३१ मार्च २०२२ अखेर एकूण संचित नफा २१.११ कोटी झाला असून कारखान्यास ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.  

आसवनी प्रकल्पातील अडचणी बाबत आपण प्रदूषण शून्य टक्क्यांवर आणले असल्याचे सांगितले व बाहेरील स्पिरिट आणण्याची गरज कमी झाली आहे.त्यात वाढ अपेक्षित आहे.१.३५ लाख लिटर उत्पादन निर्मितीचा परवाना असल्याची माहिती दिली आहे.

इथेनॉल बाबत प्रोत्साहन देत आहे.ही बाब चांगली आहे.मात्र देशी मद्याला अल्कोहोल कमी पडत आहे.त्यावर योग्य निर्णय करण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे.२१.११ कोटींचा नफा झाला आहे.वर्षभरात १५२०.२० कोटींचा भरणा करापोटी केला आहे.

सोमवारी मंत्रीगटाची बैठक होऊन ऑक्टोबर पासून गळीत हंगाम सुरू होणार आहे.३५५ लाख टन साखर उत्पादन होईल असे ईसम्माने जाहीर केले आहे.

नवीन विस्तारात चार मिल असल्या तरी त्याचे काम पूर्ण नाही बॉयलिंग हाऊस अपूर्ण आहे.त्यामुळे लवकरच पुढील हंगामात त्या सुरू होईल या वर्षी जास्तीचे गाळप होणे अशक्य आहे.

मागील वर्षी सात लाख टन ऊस प्राप्त होईल असे वाटत असताना तसे झाले नाही.हेक्टरी उत्पादन वाढले होते त्यामुळे अडचणी वाढल्या होत्या.ऊन वाढले ही मजूरांची कामाची क्षमता कमी होते.कार्यक्षेत्रातील ऊस मात्र आपण मागे ठेवला नाही.ऐनवेळचा ऊस सुद्धा तोडून नेला आहे.यावर्षी ऊस तोडणीसाठी केन हार्वेस्टिंग वापरणार आहे.त्याची उसतोडीस मोठी मदत होणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी रुंद सरी पद्धतीचा लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

सदर प्रसंगी अहवाल काळात देशातील,राज्यातील दिवंगत नेते,पदाधिकारी सभासद,आदींना कोळपेवाडी येथील सरपंच सूर्यभान कोळपे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले त्याला नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे १४ विषयांना सर्वांनी मंजुरी दिली आहे.सदर प्रसंगी सूत्रसंचालन कारखान्याचे संचालक अरुण चंन्द्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close