जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या पतसंस्थेला एनसीडीसीकडून मोठा निधी!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  भारतातील सहकारी संस्थांच्या व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्या माध्यमातून समता नागरी सहकारी पतसंस्थेला १०० कोटी रुपयांच्या निधी मंजुरीचे पत्र राष्ट्रीय सहकार विकास निगम, पुणेचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांच्या शुभहस्ते समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले आहे.

“कोपरगावातील समता पतसंस्थेने गेल्या ४० वर्षांत केलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढ तसेच महाराष्ट्रातील इतर सहकारी पतसंस्थांना दिलेले मार्गदर्शन यामुळे समताला मिळालेला हा निधी इतर सहकारी संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरेल”-गिरीराज अग्निहोत्री,विभागीय संचालक,राष्ट्रीय सहकार निगम,पुणे.

   यावेळी अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले की,”गुणवत्तेच्या निकषांवर सहकारी संस्थांची तपासणी करून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हा निधी उपलब्ध करून दिला जातो. समता पतसंस्थेला मंजूर झालेल्या या निधीचा विशेषतः सोनेतारण कर्ज वाटपासाठी उपयोग केला जाणार आहे.

  समता पतसंस्थेने गेल्या ४० वर्षांत केलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढ तसेच महाराष्ट्रातील इतर सहकारी पतसंस्थांना दिलेले मार्गदर्शन यामुळे समताला मिळालेला हा निधी इतर सहकारी संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरेल,असे गिरीराज अग्निहोत्री यांनी सांगितले. समताचा आदर्श घेऊन इतर पतसंस्थांनीही गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत आणि देशभरात सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे,असे आवाहन कोयटे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close