जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

  …ही संस्था सभासदांना देणार 15 टक्के लाभांश !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   
   अर्थिक शिस्त पाळून पदमविभूषण डॉ.शरदचंद्र पवार सहकारी पतसंस्थेने केलेली प्रगती लक्षणीय असून सभासदांना आगामी काळात पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय समाधान देणारा असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच  एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार पतसंस्थेच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे,समवेत माजी आ.अशोक काळे,कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, पतसंस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे,गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण आदी मान्यवर.

“रिझर्व बँकेने नवीन लायसन्स देण्याचे जाहीर केले आहे.पदमविभूषण डॉ.शरदचंद्र पवार सहकारी पतसंस्था,सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नियमांचे व वसुलीचे काटेकोरपणे पालन करून पारदर्शक कारभार करत आहे.त्यामुळे या संस्थेच्या दृष्टीने भविष्यात हि संधी आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या व सहकारात अग्रणी असलेल्या कोळपेवाडी येथील पदमविभूषण डॉ.शरदचंद्र पवार सहकारी पतसंस्थेसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक दिलीप बोरनारे,सुधाकर रोहोम,सूर्यभान कोळपे,श्रीराम राजेभोसले,डॉ.मच्छिंद्र बर्डे,प्रशांत घुले,सुनील मांजरे,शंकरराव चव्हाण,मनोज जगझाप,दिनार कुदळे,श्रावण आसने,तसेच कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण,विश्वास आहेर,ज्ञानदेव मांजरे,बाबासाहेब कोते,सोमनाथ चांदगुडे,सुभाष गाडे,गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेचे  सर्व संचालक मंडळ ,मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,”या संस्थेने पारदर्शक कारभार,आर्थिक शिस्त,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली.संस्थेकडे ५३.२४ कोटी रूपयांच्या ठेवी असून ४० कोटी ६८ लाख कर्ज वाटप केले आहे.ढोबळ एनपीए ३.५२ टक्के असून एनपीए च्या व्याज व मुद्दलासाठी ०८ कोटी ६३ लाख ८५ हजाराची गुंतवणूक केली आहे.शंभर टक्के तरतुदीमुळे निव्वळ एन.पी.ए.०% आहे.१ कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला.अॅडीट वर्ग ‘अ’ आहे.सभेच्या अध्यक्षपदाची सुचना राजेंद्र ढोमसे यांनी मांडली त्यास अशोक भगत यांनी अनुमोदन दिले आहे.

  यावेळी अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी केले.विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे.याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close