जाहिरात-9423439946
सहकार

….हा साखर कारखाना ए.आय.चा वापर करणार माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आधुनिक समजलेल्या जाणाऱ्या ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून त्यात उसाची नोंद शेतकरी करणार आहे त्याचं बरोबर मोबाईल ॲप तयार करून त्यातून शेतकऱ्यांना स्वतःच्या उसाची नोंद,उसाचे सरासरी वजन,उस देयके व सवलतीची साखर याबद्दल माहिती समजणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलतांना कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,समवेत माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,गौरी शिंदे आदी पदाधिकारी दिसत आहेत.

   कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४/२५ च्या ७० व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे व गौरी शिंदे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी संचालक दिलीप बोरनारे,सुधाकर रोहोम,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे,सूर्यभान कोळपे,श्रीराम राजेभोसले,प्रवीण शिंदे,अनिल कदम,अशोक मवाळ,सुनील मांजरे, मनोज जगझाप,वसंतराव आभाळे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,वत्सला जाधव,इंदुबाई शिंदे,दिनार कुदळे,प्रशांत घुले,गंगाधर औताडे,श्रावण आसने,सचिव बाबा सय्यद,उपसचिव संदीप शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक व पदाधिकारी,ऊस उत्पादक सभासद,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”स्व.शंकरराव काळे व स्व.शंकरराव कोल्हे यांनी साठ सत्तर वर्ष जोपासलेली कारखानदारी सुदृढ व सक्षम रित्या चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची व प्रयत्नांची गरज आहे.कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.११३ दिवस चाललेल्या २०२५-२६ च्या गळीत हंगामात ६ लाख ६५ हजार १३६  मे.टन ऊसाचे गाळप होवून ७ लाख ५९ हजार ६७५ क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.४१ टक्के राहिला असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

  याप्रसंगी प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले व उपस्थितांचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलतांना कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,समवेत माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,गौरी शिंदे आदी पदाधिकारी दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close