जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या गावी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव प्रतिनिधी-तालुक्यातील पढेगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच मीनाताई शिंदे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्रीय राखीव दलाचे (CRPF)सेवानिवृत्त जवान दिलीप गिर्हे,विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक शिंदे तर न्यु इंग्लिश स्कुल माध्यमिक विद्यालयाचे उत्तम चरमळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्लड पासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे.याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.तो पासून हा दिन उत्साहात संपन्न होत आहे.पढेगाव येथे तो उत्साहात संपन्न झाला आहे.

या उत्सवासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदू उसरे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे सर्व शिक्षक व विकास सोसायटीचे सचिव बाळासाहेब शिंदे आदींनी चांगल्या प्रकारे संचलन केले.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सालाबादा प्रमाणे गावात प्रभातफेरी काढली होती.प्राथमिक शाळेत झेंडावंदन झालेनंतर गणेश दाणे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीपर गिते आणि भाषणे सादर केली.दिलीप गिर्हे ,उत्तम चरमळ,संदीप शिंदे आदींची भाषणे झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष जगताप महाराज,सर्व व्यवस्थापन कमेटी,ग्रामपंचायत,सोसायटी सदस्य,माजी सरपंच प्रकाश शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरीक पालक,पोष्ट विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
त्यावेळी सहशिक्षिका तांबोळी मॕडम कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले शेवटी विद्युल्लता आढाव यांनी आभार मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close