जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

शिर्डीत योग दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आधुनिक जीवनात निरोगी राहण्‍यासाठी योग साधना अत्‍यंत महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने आयोजीत जागतीक योग दिन कार्यक्रमात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी केले आहे.

दि.२१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. संपूर्ण जगभरात योग दिन साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला होता त्यास त्यांनी मंजुरी दिली असून आता शिर्डीसह हा दिन जगभर साजरा करण्यात येत आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने व्‍दारावती भक्‍तनिवास समोरील बागेत २१ जुन जागतिक योग दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात आला.या कार्यक्रमास संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर,प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी,प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई,शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य,मुख्‍याध्‍यापक,अध्‍यापक,विद्यार्थी,संस्‍थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.योगाचार्य डॉ.तुषार शिसोदीया यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करुन योगासने करुन घेतले.यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेसह संस्‍थान अधिकारी,कर्मचारी शिर्डी ग्रामस्‍थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्‍या योगासने केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close