जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

जीवनात शिक्षक आणि शिक्षण या दोन घटकांचे योगदान महत्वपूर्ण-न्या.अग्रवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

माणसाच्या जीवनात शिक्षण आणि शिक्षक या दोन घटकांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांनीच भारताच्या अनेक पिढ्या घडवल्या आहे त्यातील एक अग्रक्रमावरील नाव म्हणून रांजणगाव देशमुख येथील माजी मुख्याध्यापक धोंडिबा पाराजी रणधीर (गुरुजी) यांचे नाव गणले जाईल असा विश्वास अ.नगर जिल्हा ग्राहक मंचाचे न्या.विवेककुमार अग्रवाल यांनी रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केला आहे.

माजी मुख्याध्यापक रणधीर गुरुजी यांचे चिरंजीव अड्.प्रदीपकुमार रणधीर व युनियन बँकेचे व्यवस्थापक संदीप कुमार रणधीर हे असून त्यांनीं त्यांच्या पिताश्रींच्या अमृतवर्षांनिमित्त त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण केले आहे.त्यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रांजणगाव देशमुख येथील माजी मुख्याध्यापक धोंडिबा पाराजी रणधीर (गुरुजी) व त्यांच्या धर्मपत्नी वेल्लूबाई रणधीर यांचा ‘अमृत महोत्सवी वर्ष सोहळा’ हा कार्यक्रम नुकताच रांजणगाव देशमुख येथील,’मंगलमूर्ती मंगल’ कार्यालयात नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.शंतनू धोर्डे,कोपरगाव पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष दिलीपराव ढेपले,अड्.तृप्ती रणधीर,माजी विद्यार्थी श्री कालेवार सर,आदिसंह तालुक्यातून बहुसंख्य विद्यार्थी,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,विधी,क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक,नातलग उपस्थित होते.

सदर प्रसंगी या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घेण्यात आलेल्या विविध कला गुणांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना पूरस्कार देण्यात आले आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक संदीप कुमार रणधीर यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन संगीता संजय खरात यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार कोपरगाव न्यायालयातील वकील संघाचे सदस्य अड्.प्रदीपकुमार रणधीर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close