जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पशुसंवर्धन विकास

पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा,तीन जखमी !    

न्यूजसेवा

धामोरी-(वार्ताहर)

   कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील खंडेराव मंदीर परिसरालगत चौकात नुकतेच दोन लहान बालक अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्याने चावा घेतला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे ते फक्त तेवढ्यावरच थांबले नाही तर पुन्हा काही वेळाने एक युवकाचा चावा घेतला आहे परिणामी धामोरी आणि परिसरातील कुंटुबीय भयभीत झाले असल्याचे दिसून आले आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोकाट जनावरे आणि प्राण्याचा मोठा उच्छाद असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अनेक अपघात होत आहेच पण अनेकाना हे प्राणी चावा घेऊन जखमी करत आहेत.अशीच घटना धामोरी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोकाट जनावरे आणि प्राण्याचा मोठा उच्छाद असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अनेक अपघात होत आहेच पण अनेकाना हे प्राणी चावा घेऊन जखमी करत आहेत.अशीच घटना धामोरी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे काही तरुणांनी धाडस करून काठी,दांडके,दगड आदींच्या सहाय्याने त्याला अडविण्यासाठी दोरखंड असे विविध साधणे वापरूण मारण्याचा प्रयत्न केला आहे.शेवटी बऱ्याच परिश्रमाने युवकांना थकविल्यानंतर त्याल जीवे मारण्यास यश आले आहे.त्यामुळे लहान मुले स्त्रीया आदींनी सुटेकचा श्वास घेतला आहे.तरुणाच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.ग्रामपंचायतीने या मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close