न्यायिक वृत्त
…या कार्यकर्त्याची न्यायालयाने केली निर्दोष सुटका

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुका भाजपने तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भगवा दहशतवाद या उल्लेखाने देशात वाद निर्माण झाला होता.त्यातून कोपरगाव तालुक्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली आहे.त्यात भाजपचे कार्यकर्ते विनायक गायकवाड,चेतन खुबाणी,सुभाष दवंगे यांचेसह दहा जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्त केले आहे.या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सन -२०१३ मध्ये,तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उल्लेख करत संसदेबाहेर “भगवा दहशतवाद” असा आरोप केला होता,ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.त्यातून कोपरगावात शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले होते त्यातून हा गुन्हा दाखल झाला होता.त्यातील दहा कार्यकर्त्यांना आता कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष घोषित केले आहे.त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सन -२०१३ मध्ये,तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उल्लेख करत संसदेबाहेर (जयपूर येथील काँग्रेस चिंतन शिबिरात) “भगवा दहशतवाद” असा आरोप केला होता,ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.त्यात त्यांनी म्हटले होते की,”राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमधून ‘भगवा दहशतवादा’ला खतपाणी घातले जात आहे.आपल्या विधानाचे समर्थन करताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट आणि समझौता एक्सप्रेस स्फोटात हिंदू संघटनांचा सहभाग असल्याचे संकेत दिले होते.शिंदे यांच्या या विधानामुळे भाजपने संसदेत गदारोळ केला होता.भाजपने काँग्रेसवर हिंदूंना बदनाम करण्याचा आरोप केला.तीव्र पडसादानंतर शिंदेंना त्यांचे विधान मागे घ्यावे लागले होते आणि त्यांनी “भगवा दहशतवाद” या शब्दाच्या वापराबाबत खेद व्यक्त केला होता.मात्र या घटनेचे तीव्र पडसाद कोपरगावसह देशभरात उमटले होते.त्यातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर मोठे आरोप होऊन अनेकांनी तत्कालीन गृहमंत्री शिंदे यांचे पुतळे जाळले होते.त्यातून कोपरगाव शहरात येथील भाजपचे कार्यकर्ते विनायक गायकवाड,चेतन खुबाणी,सुभाष दवंगे,सैदू बाबा शेख,राजेंद्र खिलारी,राजेंद्र खैरे,बाळासाहेब वाघ,रविकरण ढोबळे,अक्षय क्षत्रीय,स्व.प्रा.सुभाष शिंदे यांचेवर सरकारने गुन्हा दाखल केला होता.

सदर घटना सन -2013 रोजी झालेली असल्याने सरकार तर्फे सन -2016 साली रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून याबाबत आरोपींचे वकील ॲड.मच्छिंद्र खिलारी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर सरकारी पक्षाच्या वतीने त्यावर आक्षेप घेतला होता.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व पुरावे तपासून वरील सर्व कार्यकर्त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे.सदर खटल्यात कार्यकर्त्यांच्या वतीने ॲड.मच्छिंद्र खिलारी व संजय मंडलिक यांनी बाजू मांडली होती.कोपरगाव शहरा त या निकालामुळे सत्याचा विजय उशिरा होतो पण होतोच अशा प्रतिक्रिया भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे यांनी दिली आहे.या निकालाने सर्वत्र स्वागत होत आहे.


