जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पत्नीची क्रूर हत्या,पतीला जन्मठेप,न्यायालयाचा निकाल!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील टिळेकर वस्ती येथील पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून दुपारी ती जेवणासाठी जात असताना तिची हातोड्याच्या सहाय्याने क्रूर हत्या करणारा पती अरुण रतन दाभाडे (वय -37) यास कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान तज्ञांच्या मते आणि ताज्या बातम्यांच्या विश्लेषणानुसार याची प्रमुख कारणे ही संवादाचा अभाव आणि टोकाचा राग,पती-पत्नीमधील विश्वासाच्या कमतरतेमुळे संशय निर्माण होतो.जेव्हा हा संशय चर्चेने सोडवला जात नाही,तेव्हा राग विकोपाला जातो आणि त्याचे रूपांतर हत्येसारख्या हिंसक कृत्यात होते.त्यातले त्यात सोशल मीडिया आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रमाण वाढले आहे.कोपरगाव येथील घटना त्याला अपवाद नाही.

   चारित्र्याच्या संशयावरून पतींच्या हत्येचे प्रमाण वाढण्यामागे अनेक सामाजिक,मानसिक आणि तांत्रिक कारणे असल्याचे दिसून येते.तज्ञांच्या मते आणि ताज्या बातम्यांच्या विश्लेषणानुसार (२०२५-२०२६) याची प्रमुख कारणे ही संवादाचा अभाव आणि टोकाचा राग,पती-पत्नीमधील विश्वासाच्या कमतरतेमुळे संशय निर्माण होतो.जेव्हा हा संशय चर्चेने सोडवला जात नाही,तेव्हा राग विकोपाला जातो आणि त्याचे रूपांतर हत्येसारख्या हिंसक कृत्यात होते.त्यातले त्यात सोशल मीडिया आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रमाण वाढले आहे.ऑनलाइन राहणे किंवा कोणाशी तरी बोलणे यातून गैरसमज निर्माण होत आहेत.त्यात आधुनिक जीवनशैलीतील ताणतणाव,नैराश्य किंवा काही प्रकरणांमध्ये व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीची विचार करण्याची क्षमता कमी होते त्यातून अशा घटनांची वाढ होतांना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरानजीक असल्या टिळेकर वस्ती जवळ दिनाक 19 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2.14 वाजेच्या सुमारास घडली होती.यातील मयत महिला ही दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील आचारी हॉस्पिटलमधून जेवण करण्यासाठी जेऊर पाटोदा येथील तिच्या राहत्या घराकडे पायी जात होती.त्याचवेळी वाटेत दबा धरून बसलेला तिचा नवरा अरुण दाभाडे (वय-37) याने संशयाच्या भरात तिच्यावर क्रूर हल्ला चढवला होता.सोबत आणलेल्या लोखंडी हातोड्याने पत्नीच्या डोक्यात मोठ्या शक्तिनिशी वार करून तिला जागीच ठार मारले होते.या घटनेने संपूर्ण कोपरगाव तालुका हादरून गेला होता.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास चक्र फिरवली होती.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास बी.पावरा यांनी घटनेचा पंचनामा करून त्या पुराव्यांचे संकलन करून तातडीने भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात वेळेवर दोषारोप पत्र दखल केले होते.

   दरम्यान सरकारी वकील शरद गुजर यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती.यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात मोलाची भूमिका निभावली होती.दरम्यान यात दोन वर्षांच्या आत या प्रकरणाचा तपास,साक्षी-पुरावे आणि अंतिम निकाल लागल्याने न्यायालयीन प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.या खटल्यात महिला फौजदार नंदा गलांडे,पोलीस कॉ.सुभाष माळी,फटांगरे आदींनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

   दरम्यान केवळ संशयापायी संसाराची वाट लावणाऱ्या या नराधमाला कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याची जागा नेमकी कोठे आहे हे दाखवून दिल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close