जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

राष्ट्रवादीच्या दोघांची…या पदावर नियुक्ती !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील युवक कार्यकर्ते राजेंद्र रामचंद्र औताडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी तसेच निलेश एकनाथ औताडे यांची कोपरगाव तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

पोहेगाव येथील युवक कार्यकर्ते राजेंद्र औताडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी तसेच निलेश औताडे यांची कोपरगाव तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली त्यावेळी त्यांना नियुक्त पत्र सुपूर्त करताना ॲड.संदीप वर्पे आणि  जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले आदी मान्यवर.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक बदल आणि कोअर कमिटीच्या बैठकांद्वारे पक्षबांधणी वेगाने सुरू आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात या पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे आणि त्यांचे सहकारी उपाध्यक्ष सचिन मुजगुले आदींनी कंबर कसली असून पक्ष वाढीसाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यातील एक भाग म्हणून कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोहेगाव येथील दोन युवक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली आहे.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक बदल आणि कोअर कमिटीच्या बैठकांद्वारे पक्षबांधणी वेगाने सुरू आहे.ऑगस्ट २०२६ मध्ये मुंबईत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने १० नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड,क्लाईड क्रास्टो यांचा समावेश आहे.खा.शरद पवार हेच पक्षाचे सर्वेसर्वा आणि मार्गदर्शक आहेत.पक्षात विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावत मूळ पक्षाची वैचारिक बैठक टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे.निवडणूक आयोगाने या गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले असून,महाविकास आघाडीमध्ये पक्ष सक्रिय भूमिका बजावत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात या पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे आणि त्यांचे सहकारी उपाध्यक्ष सचिन मुजगुले आदींनी कंबर कसली असून पक्ष वाढीसाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यातील एक भाग म्हणून कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोहेगाव येथील दोन युवक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली आहे.त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

  सदर प्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले,तालुका उपाध्यक्ष संतोष सदाफळ,तालुका युवक उपाध्यक्ष ऋषिकेश गवळी,सोमनाथ घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.रोहित पवार,खा.निलेश लंके,प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.दादाभाऊ कळमकर,जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे,उपाध्यक्ष सचिन मुजगुले आदी सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close