जाहिरात-9423439946
निवडणूक

नवमतदार नोंदणी-दुरुस्ती शिबिरास…या शहरात प्रतिसाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राबविलेल्या मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिरास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे.हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिलं जातं.‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी २५ जानेवारी ला साजरा केला जातो. त्याचबरोबर मतदान कार्ड हे राजकीय प्रक्रियेत आपल्या प्रत्येकासाठीच अत्यंत महत्वाचे आहे.त्यासाठी नवीन मतदारांसाठी जनजागृती हि महत्वाची प्रक्रिया आहे.

आगामी कालखंडात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत.या निवडणुकीत पात्र मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी व ज्या मतदारांची मतदार यादीत काही दुरूस्ती किंवा बदल करावयाचे आहेत अशा मतदारांसाठी आ. काळे यांनी कोपरगाव शहरात मंगळवार (दि.२२) ते गुरुवार (दि.२४) या कालावधीत मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिर आयोजित केले आहे.

कोपरगाव शहरातील एकूण १५ प्रभागात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास पहिल्याच दिवशी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.नवमतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी शिबीरस्थळी सविस्तर माहिती देवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नवमतदारांचे अर्ज भरून घेतले जात आहे. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नाही, त्यांची देखील नावनोंदणी करून घेवून मतदार यादीतील नाव दुरुस्ती बरोबरच इतरही दुरुस्त्या या शिबिराच्या माध्यमातून होत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे व मतदार नोंदणी करून आपल्याला मतदानाचा हक्क मिळणार असल्यामुळे नवमतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.या शिबिराचा लाभ घेवून सर्व पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close