जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

कोपरगाव शहरात पाणपोईचे उदघाटन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमानात वाढत असलेल्या उन्हाच्या काहिलीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील धारणगाव रस्त्यालगत खुल्या नाट्यगृहाजवळ असलेल्या ठिकाणी जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी आपले पिताश्री कै.ग्यानबा सोनबा धुमाळ यांचे स्मरणार्थ सलग १८ व्या वर्षी अक्षय तृतीया व रमजान ईद या पवित्र दिवशी शुद्ध पाण्याच्या पाणपोईचे उदघाटन एक.के.आढाव विद्यालयाचे शिक्षक माधवराव जोशी व विराज किर्लोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले आहे.

पाणपोईची व्यवस्था पूर्वीच्या काळात,देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्री पासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेवले जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे व पवित्र काम समजले जाते.अशीच पाणपोई नुकतीच जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ आणि आपले पिताश्री ग्यानबा धुमाळ यांचे स्मरणार्थ सुरु केली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फार पूर्वीपासुन,कडक उन्हाळ्यात,जाण्याऱ्या येणाऱ्या पांथस्थांना ‘पिण्याचे थंड पाणी’ मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ व निःशुल्क व्यवस्था म्हणजे पाणपोई समजली जाते.या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात,देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्री पासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेवले जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे व पवित्र काम समजले जाते.अशीच पाणपोई नुकतीच जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ आणि आपले पिताश्री ग्यानबा धुमाळ यांचे स्मरणार्थ सुरु करण्याची प्रथा गत अठरा वर्षपूर्वी सुरु केली आहे.ती आजही सुरु आहे.उन्हाळ्याची तीव्रता सध्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून तहानलेल्या जीवनासाठी पाणी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.हि गरज ओळखून त्यांनी हि शुद्ध पाण्याची पाणपोई सुरु केली आहे.

सदर प्रसंगी सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयाच्या प्रा.शीला गाडे,माधवराव आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव जोशी,मेहमूदभाई बागवान,माजी नगसेवक जयवंत मरसाळे,आयुबभाई शेख,विकास आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान उमेश धुमाळ यांच्या या पाणपोईच्या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close