शैक्षणिक
…या जि.प.शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पा.चासनळी या ठिकाणी चिमुकल्या बालगोपाळांचे,’वार्षिक स्नेहसंमेलन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लहान बालकांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांत स्नेहसंमेलन आयोजित केले जात आहे.वर्तमानात पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी चासनळी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सूनिता बनसोडे,गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक पंडीत चांदगुडे,नानासाहेब बनसोडे,संजय चांदगुडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत माळी सर्व सदस्य,संतोष पऱ्हे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड,शिक्षक पालक विद्यार्थी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पंचायत समिती कोपरगावचे साधन व्यक्ती विवेक सोनवणे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले आहे व शाळेतील पालक सचिन चांदगुडे व योगेश चांदगुडे यांनी विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस दिले आहे.
सदर प्रसंगी गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक पंडित चांदगुडे,श्री बनसोडे यांनी मराठी शाळेतील शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे तर संजय शिंदे यांनी शाळेसाठी मोफत लाईट माळ सजावट करून दिली होती.
सदर सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोगरे मॅडम व साबळे मॅडम,तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड,मिननाथ माळी,भीमा गोडे,सिताराम कचरे,संतोष पारासुर आदींनी परिश्रम घेतले आहे.