जाहिरात-9423439946
निवडणूक

अशोक कारखाना निवडणुक,सत्ताधारी गटापुढे शेतकरी संघटनेचे मोठे आव्हान ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

श्रीरामपूर-(नानासाहेब जवरे)

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला आहे.माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्यासह समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरले.त्यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या पॅनलच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी शेतकरी संघटना यशस्वी झाली होती.त्यांच्याशी सामना चांगलाच रंगला होता.त्या मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना आमच्या प्रतिनिधीने या निवडणुकीचा घेतलेला आढावा.

दर निवडणुकीत कारखान्याला तोट्यातून काढू म्हणणारे,व विविध आमिषे दाखविणारे पण तोट्यात का गेला हे गुलदस्त्यात ठेवणारे पुढारी.

विविध प्रकारे युक्तिवाद करून तुम्ही सत्य किंवा वास्तवता फेटाळून लावू शकता पण म्हणून ते सत्य संपत नाही की त्याचे परिणाम व्हायचे थांबत नाही ते परिणाम भोगण्यातून युक्तिवाद करणाऱ्यांची सुटका नसते.सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात त्याचे वारंवार अनुभव येत असतात.खरी समस्या नाकारून संपत नाही अधिक चिघळते,फोफावते.याचा वर्तमानातं श्रीरामपुरातील या नेत्याना विसर पडल्याचे दिसून आले आहे.

शेतकरी संघटनेचे अॅड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानीचे कार्यकर्ते व आदिक,व विद्यमान सभापती डॉ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांचे समर्थक एकवटे आहे.येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपली असून उद्या दि.१६ जानेवारी रोजी मतदान होणार तर १७ जानेवारी २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.मतमोजणीचे स्थळ अद्याप निश्चित नसून ते लवकरच निश्चित केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी यांनी दिली आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याचे ११ हजार ७३६ इतके सभासद असून ते मतदानासाठी पात्र राहणार आहेत.२१ जागांसाठी ही निवडणूक संपन्न होत आहे.पढेगाव,कारेगाव,टाकळीभान,वडाळा महादेव,उंदिरगाव असे पाच गट असून प्रत्येक गटात ३ असे १५ संचालक निवडून द्यावयाचे आहेत.तसेच उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा एक प्रतिनधी,अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीचा एक प्रतिनिधी,दोन महिला प्रतिनिधी,भटक्या विमुक्त जाती व जमाती,विशेष मागास प्रवर्ग एक प्रतिनिधी असे २१ संचालक आपले भविष्य आजमावत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात येऊन ती आता अंतिम टप्पा संपन्न झाला आहे.माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या पस्तीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीच्या सत्ताकारणाला शेतकरी संघटनेने श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक व भानुदास मुरकुटे यांची स्नुषा तथा श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांच्या साथीने मोठे आव्हान उभे केले आहे.त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचा बातम्या आहेत.त्यातून सभासदांना बोकड पार्ट्या आणि मद्याचा ऊत आला आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले हे कार्यकर्ते आक्रमक असून त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून भानुदास मुरकुटे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.औताडे यांनी म्हटले आहे की,”अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी सरकारने तीन वेळा कायद्यात बदल घडवून प्रस्थापितांना अभय दिले आहे.मात्र येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्त्वाखाली संघर्ष करून सभासदांच्या मदतीने परिवर्तन घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सभासदांना प्रचार सभात जाहिररित्या खोटी आश्वासने देणारे पुढारी व कसे बनवले…म्हणुन खाजगीत मजा लूटणारे आनंद यात्री.

“कोणालाही सत्ता केंद्रापासून फुटीर व्हावे असे वाटते त्यामागे सर्वात महत्वाचे कारण असते ते आर्थिक प्रगतीच्या संधीचा अभाव.हि प्रगती आणि त्या साठीच्या संधी समानपणे उपलब्ध असतील तर उगाच कोणी सुखासुखी फुटीरतेची भाषा करत कृती करत नाही.अशोकच्या कार्यक्षेत्रात याचा अनुभव येत आहे.

अशोकच्या प्रस्थापितांनी शेतकरी संघटनेचा पॅनल होऊ नये म्हणून सहकारी संस्थांच्या नेत्यांच्या पारंपरिक सवयी प्रमाणे तालुक्यातील मुळा-प्रवरा संस्थेचा गैरवापर केला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून संस्थेचे कार्यालय बंद ठेवले होते.परंतु ॲड.अजित काळे यांनी अनिल औताडे यांच्या नावे याचिका दाखल करून मुळा प्रवरा कार्यालय खुले करण्याचे आदेश मिळवुन सुग्रास जेवणाच्या पहिल्याच घासाला खडा लागावा तसा पहिलाच पण मोठा झटका मुरकुटे गटाला दिला आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांना बेबाकी दाखले मिळू शकले.मुळा प्रवराच्या कार्यक्षेत्रात थकबाकींमुळे इतर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची उदाहरणे फार जुनी नाही.ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकरी संघटनेने अड्.अजित काळे यांच्या पुढाकारातून सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला आहे.त्यामुळे त्यांना अनास्थेने का होईना सभासदांपुढे जावे लागले आहे.एरव्ही सहकारी साखर कारखानदारीत आता निवडणुका हा डाव्या हाताचा खेळ बनला आहे.कोपरगावातील काळे-कोल्हे,विखे-थोरात तर अनेक वर्षांपासून हा बिनविरोध खेळ गेली अनेक वर्ष खेळत आहेत.त्यांचा वार्षिक सर्वसाधारण सभेत एकाच दुकानाचा चिवडा तर विशेष चर्चेच्या स्थानी असतो.ऊस दराच्या बाबतीतही वेगळी स्थिती नाही.अशीच अस्वस्था अशोकची सहकारी साखर कारखण्याची बनली होती.सहकारातील नेते मंडळी मतदारांना गृहीत धरूनच चालतात आपण सांगू तशीच भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे हि नेते मंडळींची अपेक्षा असते.त्याला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदा सुरुंग लागला गेला आहे.याची दखल थेट राज्य पातळीवर सहकार साखर संघाने घेतल्याचे वृत्त असून या निवडणुकीकडे राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील दिग्गजांचे लक्ष लागून आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात येऊन ती संपली असली तरी सभासदांचा मिळणारा प्रतिसाद नक्कीच लक्षवेधी होता.व आहे.माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या पस्तीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीच्या सत्ताकारणाला शेतकरी संघटनेने श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक व भानुदास मुरकुटे यांची सून तथा श्रीरामपूर पंचायत समितीच्या अध्यक्षा डॉ.वंदना मुरकुटे यांच्या साथीने मोठे आव्हान उभे केले आहे.त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचा बातम्या आहेत व त्याला आमच्या प्रतिनिधीस मातापूर,पढेगाव,टाकळी भान,वडाळा महादेव,कारेगाव आदी ठिकाणी आयोजित सभांना मिळणारा लक्षवेधी प्रतिसाद पाहता तसे पुरावे मिळाले आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले हे कार्यकर्ते आक्रमक असून त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून भानुदास मुरकुटे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.औताडे यांनी म्हटले आहे की,”अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी सरकारने तीन वेळा कायद्यात बदल घडवून प्रस्थापितांना अभय दिले आहे.मात्र येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेचे नेते तथा उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्त्वाखाली संघर्ष करून सभासदांच्या मदतीने परिवर्तन घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तो आता सभासद किती रास्त ठरवतात ते लवकरच दिसणार आहे.अशोकच्या प्रस्थापितांनी शेतकरी संघटनेचा पॅनल होऊ नये म्हणून आपल्या पारंपरिक सवयी प्रमाणे तालुक्यातील मुळा-प्रवरा संस्थेचा गैरवापर केला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून संस्थेचे कार्यालय बंद ठेवले होते.परंतु ॲड.अजित काळे यांनी अनिल औताडे यांच्या नावे याचिका दाखल करून मुळा प्रवरा कार्यालय खुले करण्याचे आदेश मिळवुन मोठा झटका मुरकुटे गटाला दिला आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांना बेबाकी दाखले मिळू शकले.मुळा प्रवराच्या कार्यक्षेत्रात थकबाकींमुळे इतर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची उदाहरणे फार जुनी नाही.ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकरी संघटनेने अड्.अजित काळे यांच्या पुढाकारातून सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला आहे.त्याचा पुरावा त्यांच्या सभांना होणारी गर्दी दाखवून देत होती.कोणालाही सत्ता केंद्रापासून फुटीर व्हावे असे वाटते त्यामागे सर्वात महत्वाचे कारण असते ते आर्थिक प्रगतीच्या संधीचा अभाव.हि प्रगती आणि त्या साठीच्या संधी समानपणे उपलब्ध असतील तर उगाच कोणी सुखासुखी फुटीरतेची भाषा करत कृती करत नाही.अशोकच्या कार्यक्षेत्रात याचा अनुभव येत आहे.

शेतकरी संघटनेचे गोविंद वाघ,ॲड.सर्जेराव कापसे,किशोर पाटील यांच्यासह पंधरा उमेदवारी अर्ज कारखान्याने चुकीची माहिती दिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पुरी यांनी बाद केले होते.याबाबत शेतकरी संघटनेने प्रादेशिक (साखर) सहसंचालक व उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे.अशोक कारखान्याने दिलेली उपविधी व निवडणूक निर्णयाधिकारी यांचेकडे मिळालेली उपविधी यामध्ये मोठी तफावत आढळली होती.वास्तविक सहकारात एस.टी,एन.टी. व ओ.बी.सी. व महिला या जागांसाठी तीन वर्षे ऊस असल्याचे कुठल्याही सहकार कायद्यात अभिप्रेत नसताना कारखान्याने संघटनेचे अर्ज अवैध करण्याच्या दृष्टीने जिल्हा उपनिबंधक अथवा प्रादेशिक सहसंचालक यांची मंजुरी नसलेल्या उपविधीचा वापर करून संघटनेचे अर्ज अवैध ठरवुन मोठा कहर केला होता.

लोकशाहीचा गळा घोटणारी ही कृती असून समोर पराभव दिसत असल्यामुळेच प्रस्थापितांकडून सत्तेच्या गैर मार्गांचा अवलंब केला जात असल्याचा आरोप अनिल औताडे व जितेंद्र भोसले यांनी केला होता.आणि तो सार्थ म्हटला पाहिजे.सहकारात संचालक मंडळाची मुदत पाच वर्षे असताना सत्ताधाऱ्यांनी सात वर्षे सत्ता भोगली.यावरूनच सरकार प्रस्थापितांच्या बाजून काम करीत असल्याचा आरोप हा प्रस्थापितांना अंतर्मुख करणारा ठरला आहे.त्यामुळे आता शेतकरी संघटनेने कंबर कसली असून ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्त्वाखाली बदल घडवणार असल्याचा व्यक्त केलेला विश्वास सभासदांमधून सभासदांना भावून गेला आहे.

अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी लोकसेवा मंडळाकडून तर त्यांच्या स्नुषा पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांनी शेतकरी संघटनेकडून टाकळीभान गटातून सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.त्यामुळे सासरा विरुद्ध सून अशा लढत खूपच चर्चेचा विषय ठरून गेली होती.टाकळीभान,भोकर,कमालपूर,घुमनदेव,घोगरगाव,बेलपिंपळगाव अशी सहा गावे असलेल्या गटात दोन हजार ५९७ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सन-१९८७ ते आजतागायत माजी आमदार मुरकुटे हे टाकळीभान गटातून निवडणूक लढवीत एक हाती कारखान्याचे प्रतिनिधित्व करीत आहे.डॉ.वंदना मुरकुटे यांनी गेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या टाकळीभान गणातून एक हजार २५० मताधिक्याने विजयी होऊन भानुदास मुरकुटे यांना मोठा धक्का दिला होता.आता या निवडणुकीत नेमके काय होणार याकडे सभासदांचे व राज्यातील सहकार क्षेत्रातील धुरिणांचे लक्ष लागून आहे.

बोलणे हे कळून सावरून केले गेले पाहिजे,बोलणे हे सत्य शोधनाचे साधन आहे.मात्र अशोक सहकारी साखर कारखण्याची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरत असताना दिसून येत आहे.या निवडणुकीत सासरे असलेले माजी आ.मुरकुटे यांनी आपल्या चिरंजीवांवर व आपल्या सुनेवर ज्या अपद्धतीने आरोपांची मालिका चालवली ती पाहता हा कौटुंबिक कलह यांना घरात बसवून मिटवता आला नसता का ? असा सवाल कोणाही सुज्ञास न पडला तर नवल.कुटुंब व्यवस्था अशी उसवली गेली तर आगामी पिढीचे भवितव्य काय असेल व तुम्ही दुसऱ्यांना कोणत्या तोंडाने संस्काराची भाषा बोलू शकाल असा सवाल निर्माण झाला नाही तर नवल.पण आरोप करणारे व त्याला उत्तर देणारे या दोघांनीही त्याचा विधिनिषेध पाळला नाही हे विशेष! राजकारणात प्रत्येकजण आपापल्या संधीची वाट पहात असतो.आणि संधी आल्यावर जन्मदात्या बापाशीही दगाफटका करू शकतो असे दिवस आता राजकारणात आला आहेत.याच्या उलट अनुभव श्रीरामपुरात येत आहे.आपले फाटके झाकण्यासाठी दुसऱ्याचे वस्त्र ओढून त्याला विवस्त्र करणे हे खऱ्या लोकशाहीच्या संकल्पनेला काळिमा फासणारे आहे.याचा दोन्ही पक्षांस विसर पडला होता.तुम्ही सत्य नाकारले म्हणून त्याच्या परीणामांपासून सुटका नसते.त्याचा अर्थ इतकाच की,विविध प्रकारे युक्तिवाद करून तुम्ही सत्य किंवा वास्तवता फेटाळून लावू शकता पण म्हणून ते सत्य संपत नाही की त्याचे परिणाम व्हायचे थांबत नाही ते परिणाम भोगण्यातून युक्तिवाद करणाऱ्यांची सुटका नसते.सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात त्याचे वारंवार अनुभव येत असतात.खरी समस्या नाकारून संपत नाही अधिक चिघळते,फोफावते.याचा वर्तमानातं या नेत्याना विसर पडल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वीच्या जुन्या क्लिप प्रसार करून त्याचा स्तर किती खालवला होता.हे हि प्रकर्षाने दिसून आले आहे.त्यात काही पत्रकारांची नावे यावे या दुर्दैविलासाला काय म्हणावे अशी स्थिती निर्माण झाली आहे.वर्तमान काळात सत्ता माणसाला किती खालच्या पातळीवर घेऊन जाणार याची चुणूक या निवडणुकीत दिसून आली आहे.व खऱ्या अर्थाने कलियुग अवतरल्याचे दिसून आले आहे.तो विषय येथे मांडण्याचा उद्देश मुळीच नाही.पण निवडणुका ज्या निर्भेळ वातावरणात व्हायला हव्या त्या तशा होत नाही.हा लिहिण्याचा खरा मतितार्थ.

आता शेतकरी संघटनेने जसा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला तसा माजी आ.मुरकुटे यांना तो प्रसिद्ध करता आला नाही.यातच सर्व बाबी सभासदांना समजून चुकल्या आहेत.त्यात सभासदांना ऊसाची उचांकी देयके,इथेनॉलची रक्कम त्यात भर घालून अंतिम देयके देणे,वजन काट्यात पारदर्शकता,व वजन काटा करण्यास शेतकऱ्यास परवानगी,सभासद करण्यासाठी निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासदत्व,ऊस तोडीसाठी सभासद व बिगर सभासद यांना प्राधान्य,अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत देयक व दिवाळीपूर्वी वीस टक्के बोनस देण्याची हमी,पारदर्शी कारभार भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याची हमी,कायदेशीर माहिती देण्याची हमी,सराला,गोवर्धन,महांकाळ वडगाव,नाउर,नायगाव,जाफ्राबाद,गोंडेगाव,मातुलठाण,आदी गावातील निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासदत्व,घरबसल्या उसाची नोंद,ऊस तोडणी कार्यक्रमाची,ऊस तंत्रज्ञानाची ऑनलाईन माहिती,कारखाना संलग्न सभासदांच्या मालकीच्या संस्था अबाधित ठेवण्याची हमी,सभासद व कर्मचाऱ्यांना रुपये १० लाख रुपयांचा जीवन विमा करण्याची हमी आदी बाबी या वास्तवाशी जुळणाऱ्या असून त्या सभासदांना भावल्या असल्या तर नवल नाही.मात्र या पातळीवर कारखाण्याचे अध्यक्ष माजी आ.मुरकुटे यांनी आपला जाहिरनामा जाहीर न केल्याने हे थेट उघडे पडल्याचे दिसून आले आहे.संपूर्ण प्रचार सभेत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नावर सविस्तर मौन पाळले आहे.व आपल्या कौटूंबिक कलहाला “भारत-पाकिस्तान” रूप देऊन काय साध्य केले हे समजायला मार्ग नाही.नाही तरी साखर कारखानदार अलीकडील काळात नको त्या विषयाला प्राधान्य क्रमावर आणून आपल्या कारखाण्याच्या कारभारावर कोणी बोलायला नको,व मर्मावर बोट ठेवायला नको याची सविस्तर सोय करत असतात याचा हा उत्तम नमुना मानायला हवा.याखेरीज यातून दुसरे काहीही दिसत नाही हे उघड आहे.यात माजी आ.मुरकुटे हे माहीर राजकारणी असल्याने दुसरा अर्थ निघणे अशक्य दिसते.त्यामुळे झाले काय की जनतेला जो संदेश जायचा तो गेला असून सभासद शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकवटले असल्याचे दिसून आले आहे.

त्यातच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यात या कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा करून पुन्हा एकदा सभासदांना ऊस दराचा विश्वास दिला आहे.तर टाकळीभान येथील सभेत माजी.आ.मुरकुटे यांचेवर तुम्ही लेखापरिक्षक असल्याचे सांगता मग ज्या तऱ्हेने या कारखाण्याचा ४५० कोटी पर्यंत तोटा वाढत गेला तो तुमच्या लौकिकाला साजेसा नसल्याचे सांगून,”तुम्ही कसले “सी.ए.”असा त्यांच्यावर हल्ला चढवला तो पाहता उपस्थितांना चांगलाच भावला आहे.तर कारेगाव येथील सभेत तर त्यांनी राज्यातील सहकारी साखर कारखानदार आधी थोडा-थोडा तोटा वाढवत जाऊन त्यातील रकमा विविध आर्थिक घोटाळे करून नंतर तो पैसा आपल्या व दुसऱ्या बँकात भरणा करून त्यातूनच या कारखान्याची स्वस्तात खरेदी करण्याचा फंडा या साखर सम्राटांनी भस्मासुरासारखा सुरु केला असून तोच प्रकार त्याची पुनुरावृत्ती अशोका सहकारी साखर करण्यात घडणार असल्याचा दावा करून सभासदांना आधीच सावध केले आहे.त्यामुळे सभासद सावध झाल्याचे मानले जात आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आधीच या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा यावर लक्ष केंदित करून हा भंडाफोड केला आहे.

तर या खेरीज क्रान्तीसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रांताध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी तर उसाचा धूर वगळता त्याचा एकही भाग वाया जात नसताना अशोक कारखाण्याच्या ऊस उत्पादकांना भाव का मिळत नाही ? याचा हिशेब जाहीर सभेत देऊन असा रोकडा सवाल विचारला आहे.त्यासाठी त्यांनी प्रत्येक घटकांचा दर व त्यातील मर्म उघड करून सत्ताधाऱ्यांना दाती तृण धरायला भाग पाडले आहे.या कारखान्यात को-जनरेशन,इथेनॉल आदी प्रकल्प असताना ऊसाचा दर वाढीव का मिळत नाही.तो वाढीव मिळायला हवा असताना तो सहाशे रुपयांनी कमी का मिळतो असा जाबसाल केला आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अन्य सहकारी साखर कारखाने ०२ हजार ५०० ते ०२ हजार ८०० चा दर देत असताना अशोक साखर कारखाना कुठे कमी पडत आहे.असा सवाल करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे.

दगडास घाम येईल सूर्य पश्चिमेस उगवेल पण वर्तमानातील सहकारातील नेते कधी खरे बोलणार नाही.लोकांचे हित इच्छिने हे नेत्यांचे वर्तन वृत्तीचे विरुद्ध आहे.अशीच बाब सभासदांचे लक्षात आणून राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनीही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे.कारखाण्याचा तोटा वाढण्याचे कारणच काय असा जाबसाल केला आहे.तुम्ही गत पस्तीस वर्ष सत्तेत असताना तुम्हीस सभासदांना कोणत्या वेगळ्या सोयी-सुविधा पुरवल्या असा सवाल करून अडचणीत आणले आहे.कारखाना स्थापन झाला त्या वेळचा गळीत क्षमता व त्या नंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी वाढवलेली क्षमता याचे उत्तर देऊन ते जरी साडेचार हजार क्षमता दाखवीत असले तरी ती केवळ ०२ हजार ८०० इतकीच असून सत्ताधारी ती ०४ हजार ५०० दाखवीत असले तरी ते थोतांड असल्याचा भंडाफोड केला आहे.त्या पातळीवरही सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली झालेली दिसली आहे.त्यामुळे या सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने त्यांना आपले सॉफ्ट टार्गेट म्हणून घरातील भांडणाला त्यांनी उकरून काढले असल्याची शक्यता अधिक दिसत आहे.

त्यातच वडाळा महादेव येथील एका शेतकऱ्याने तर माजी.आ.मुरकुटे यांचे सहकारी व साई संस्थानचे विश्वस्त यांचा समाचार घेण्यासाठी त्यांनी अशोक सहकारी साखर कारखाण्याचे विरुद्ध साखर आयुक्त यांना व संबंधितांना पाठवलेले पत्रच जाहीर करून कहर करून दिला आहे.त्यामुळे निवडणुकीचा रागरंग बदलून गेलेला दिसून आला आहे.

राजकारणात टिकून राहण्यासाठी सुद्धा राजकारणाला तात्विक,नैतिक,अधिष्ठान असावे लागते.तत्वशून्य,दिशाहीन,सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ सहन करत नाही.केवळ छक्या पंज्याचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित राहाता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे.त्याचा नीरस होण्यास फारसा वेळ लागणार नाही.शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी प्रस्थापितासमोर आव्हान उभे केल्याने त्याचा दाहक अनुभव वर्तमानात नेत्यांना येत असेल.

दरम्यान या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधी गटाचे नेतृत्व करणारे अड्.अजित काळे यांच्या विरुद्ध एकही आरोप करण्याचे धारिष्ट्य झालेले पाहायला मिळाले नाही.ना त्यांच्या एका आरोपाचे उत्तर दिले आहे.या उलट केवळ विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका आपण शेतकऱ्याचे हित जोपासत असून आरोप खरे नाही असा कांगावा करण्यापलीकडे काहीही करू शकले नाही.विरोधी गटाकडे पहिल्यांदाच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या सारखे सक्षम व चारित्र्यवान नेतृत्व लाभल्याने त्याची सर्वच पातळीवर कोंडी झाली असल्याचे दिसून आले आहे.त्या नेतृत्वामुळे तालुक्यातील सर्व मतभेद मिटवून सर्वांना एकत्र करण्यास त्यांना लीलया यश मिळाले आहे.सामाजिक परिवर्तन हे नेहमीच संथ गतीने होत असते व बहुतेक करून त्या स्थित्यंतराची जाणीव फार उशीराने समजते.अशोकच्या निडणुकीत मात्र मतदारांना बरेच आधी समजल्याचे दिसत आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत मोठे व कडवे आव्हान निर्माण झाले आहे.या लाटेत अर्थकारणाचा प्रभाव किती टिकून राहील अथवा वाचवील हे मोठे अवघड गणित बनले असून त्यातून विजय मिळवणे मोठे अवघड बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close