कोपरगाव तालुका
कोपरगावातील मोकाट जनावरांवर कारवाई सुरु-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरार फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा वाढता उच्छाद पाहता त्या विरोधात तक्रारी व अपघात वाढल्याने त्या विरोधात निविदा जारी करून कारवाई सुरु केली आहे.तथापि शहरात मोकाट जनावरे सोडून नामानिराळे राहणाऱ्या असामाजिक तत्त्वांनी आपली जनावरे त्वरित आपल्या दावणीला बांधून उपद्रव कमी करावा अन्यथा त्यावरील कारवाई अटळ असल्याचा निर्वाणीचा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
गतवर्षी शहरातील निवारा परिसरात अशाच भटक्या जनावरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या स्वच्छता विभागाच्या कर्मचारी दिसत आहे.(संग्रहित छायाचित्र)
“वर्तमानात कुत्री पकडण्याचेही काम सुरूच आहे.गायी-डुकरे जप्त केल्यास तथाकथित समाजसेवकांनी व प्राणीमित्रांनी त्यांच्या मालकांची वकिली (?) करण्यास नगरपरिषदेत येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.नगरपरिषद निवडणूक जवळ आल्याने अनेक नवे उत्साही समाजसेवक प्रसिद्धीची संधीच शोधतांना दिसत आहेत.नगरपरिषदेच्या प्रत्येक कामाजवळ जाऊन फोटो काढायचे व आमच्यामुळेच काम होत आहे असा कांगावा करत अनेकजण फिरताहेत”-विजय वहाडणे,अध्यक्ष विजय वहाडणे कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरात अनेक मालकांनी आपली गायी व तत्सम जनावरे गावात मोकळी सोडून देऊन त्यांच्या दुधाचा व तत्सम उत्पादने घेऊन या जनावरांना शहरात मोकळी सोडुन देण्याची अघोषित रितच पडली आहे.हि जनावरे ऐन रस्त्यात ठाण मांडतात काही वेळा शहरांतील रस्त्यावर अस्ताव्यस्त बसून अथवा थव्याने उभे राहून शहरातील दळणवळणास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करतात.अनेक नवशिके दुचाकी व चारचाकी वहाने शिकत असताना त्यांना या मुक्या प्राण्यांचा अंदाज येत नाही.त्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होत असून अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत आहे.मात्र बऱ्याच वेळेला दुर्घटनाग्रस्त नागरिक हे बाहेरील गावचे असतात ते तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही व आपला जीव वाचवला अशा समजात निघून जातात.मात्र अनेकांच्या जीवितावर बेतत आहे.त्यामुळे या बेताल व दुसऱ्याच्या जीवावर आपली पोळी भाजणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे.२९ सप्टेंबर २०२० रोजी निवारा परिसरात आधी रामदास रजपूत यांच्यावर या कळपाने हल्ला चढवला व त्यानंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचारी सुमनबाई कुऱ्हाडे,यांच्यावर हल्ला चढवून त्यांना रक्तबंबाळ केले होते.याचे अनेकांना स्मरण असेल.त्यावेळी या प्रभागातील नगरसेवक जनार्दन कदम यांनी या मोकाट जनावरांचा पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती.त्या नंतरही अनेक प्रभागातील नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबत मागण्या केल्या आहेत.यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांत गाई फिरतांना दिसतात.काही गाई घोळक्याने रस्त्यांवर बसलेल्या आढळतात.त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात.अनेकदा काही गायी उधळल्याने अपघातही होतात,नागरिक जायबंदी झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.नगरपरिषदेने अनेकदा शहरात भटकणाऱ्या गायींना पकडून कोकमठाण येथील गोशाळेत व कुंभारी येथे आदरणीय उंडे महाराजांच्या गो शाळेतही ठेवल्या.तरी आजही शहरात अनेक गाई फिरतांना दिसतातच.गायींच्या मालकांनी आपापल्या गाई स्वतःच्या घरी-आवारात बांधून ठेवल्या पाहिजेत.अन्यथा अशा गायी जप्त करून गायींच्या मालकांवर गुन्हा दाखल करावा लागेल.गायीचे दुध काढून घ्यायचे व नंतर त्याच गायीला कचरा,प्लास्टिक खायला शहरांत मोकाट सोडून देण्याचा बेजबाबदारपणा योग्य नाही.संबंधितांना जबाबदारीची जाणीव का नाही? याच गायी उधळल्याने एखाद्या दिवशी अपघातात तुम्हीही जायबंदी होऊ शकता निदान याची तरी भिती बाळगा.त्याचप्रमाणे डुकरांच्या मालकांनीही डुकरांचा बंदोबस्त करावा.त्यामुळे अपघात होतात-अनेकांना डुकरे चावा घेतात.आता डुकरांच्या मालकांवर गुन्हे केले जाणार आहे.पण परराज्यातील ठेकेदार बोलावून सर्व भटकी डुकरे जप्त करून केली जाणार असल्याची माहिती शेवटी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.