जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव पालिकेच्या नगरसेवकांना ऑनलाइन सभा चक्क ऐकू आली !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेची आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून या सभेचे कामकाज आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन संपन्न झाले असून एरव्ही विकासकामांचे ठराव करताना ऐकू न येणाऱ्या सत्ताधारी भाजप (कोल्हे गट) नगरसेवकांना आज हि निवडणूक प्रक्रिया चक्क ऐकू आल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांनी व माध्यमांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे एकाही नगरसेवकांची तक्रार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने याबाबत शहरात उलतसुलतच चर्चेला उधाण आले आहे.

या निवडणूंकीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक ऑनलाइन अनुपस्थित होते.त्याला गटनेते विरेन बोरावके यांनी दुजोरा दिला आहे.तर अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मात्र राष्ट्रवादीसह आमचा या निवडणुकीवर बहिष्कार असल्याचे म्हटले आहे.मात्र त्यांची उणीव भाजपच्या कोल्हे गटाने भरून काढली असल्याचे दिसून आले असून विधानसभा निवडणुकीस एवढे नाही असे तब्बल अर्धा डझन स्वीय सहाय्यक मदतीसाठी उपस्थित होते.याबाबत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेसह एकोणाविस नगरसेवक हजर असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक स्वप्नील शिवाजी निखाडे उपनगराध्यक्ष पदाचा गत सप्ताहात वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने तीन महिने उशिराने राजीनामा दिला होता.त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.पालिकेच्या निवडणुका आगामी नोव्हेम्बर महिन्यात संपन्न होत आहे.त्यासाठी आता मतांची बेगमी करण्याचा काम राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी सुरु केले आहे.त्याला कोल्हे,काळे गट शिवसेनाही अपवाद नाही.विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यावर आता या मतांची बेगमी करण्याची घाई या नेत्यांना झाली आहे.विशेषतः भाजपकडे मुस्लिम मतांचा तुटवडा झाला आहे.शहरातील हि मते विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतल्याने याचा मोठा फटका बसल्याचा या नेत्यांचा समज असून तो वास्तवाशी नाते सांगणारा आहे.त्यामुळे हि मते वळविण्याचा घोर त्यांच्या जीवाला लागला असल्यास नवल नाही.कोपरगाव नगरपरिषद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे रिक्त झालेल्या पदावर निवडणूक घेणेसाठी जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-१९६५ चे कलम ५१ अ (१) नुसार दि.०४ ऑगष्ट रोजी विशेष बैठक दूरचलचित्र फितीद्वारे घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-१९६५ चे कलम ५१ अ (२) नुसार विशेष सभेचा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी,शिर्डी भाग शिर्डी यांना प्रतिनिधी नेमलेले होते.

त्यानुसार आज सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणेचा कालावधी देण्यात आला होता या निर्धारित कालावधीत कुरेशी आरीफ करीम यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दूरचलचित्र माध्यमाद्वारे दुपारी तीन वाजता विशेष सभा चालू करणेत आली.सदर सभेत पीठासीन अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्राचे वाचन केले.त्यानंतर प्राप्त नामनिर्देशनाची छाननी करण्यात येऊन आरीफ कुरेशी यांचे नामनिर्देशन वैध ठरविण्यात आले.पिठासीन अधिकारी यांनी कार्यक्रम पत्रिकेनुसार उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिलेला होता.सदर कालावधीत त्यांनी माघार न घेतल्याने व एकमेवा उमेदवारी अर्ज आला असल्याने आरीफ कुरेशी यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.उपस्थित सर्व सदस्यांचे पीठासीन अधिकारी गोविंद शिंदे व प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी आभार मानून सभा संपल्याचे घोषित केले.त्यावेळी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व इतर अधिकारी व कर्मचारी आदींनी त्यांना सहाय्य केले आहे.या सभेसाठी कोणाही सदस्यांची तक्रार आली नाही हि विशेष घटना म्हटली पाहिजे.एरव्ही विकास कामाबाबत मात्र नेहमी उलटा अनुभव आल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्याला आजची सभा अपवाद ठरली आहे.शिवाय नगरपरिषद परिसरात काहीही गर्दीही दिसून आली नाही.मात्र या निवडीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक ऑनलाइन अनुपस्थित होते.त्याला गटनेते विरेन बोरावके यांनी दुजोरा दिला आहे.तर अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मात्र राष्ट्रवादीसह आमचा या निवडणुकीवर बहिष्कार असल्याचे म्हटले आहे.मात्र त्यांची उणीव भाजपच्या कोल्हे गटाने भरून काढली असल्याचे दिसून आले असून विधानसभा निवडणुकीस एवढे नाही असे तब्बल अर्धा डझन स्वीय सहाय्यक मदतीसाठी उपस्थित होते.याबाबत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेसह एकोणाविस नगरसेवक हजर असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.यात सेनेचे जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे गटाचे नगरसेवक गैरहजर होते.तर कोल्हे समर्थक नगरसेवक हजर असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.

नूतन उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांना तीन-साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.नेहमीच्या अंदाजाप्रमाणे २३ नोव्हेम्बर रोजी कोपरगाव पालिकेची निवडणूक होत असते.दरम्यान आमच्या प्रतिनिधीने आधीच वर्तवल्या प्रमाणे आरिफ कुरेशी यांची निवड झाल्याने आमच्या प्रतिनिधींचा अंदाज खरा उतरला आहे.त्या बाबत अनेकांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close