नदी प्रदूषण
गोदावरीसह उपनद्या दूषित,नजीकची शहरे ठरणार कॅन्सरची आगर ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आणि तिला कोपरगाव तालुक्यात येऊन मिळणाऱ्या उपनद्या मोठया प्रमाणावर प्रदूषित झाल्या असून त्यांचे पाणी मानवाला आणि विशेषता जीवमात्राला शेती सिंचनासह पिण्यायोग्य राहिले नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उघडकीस आणली आहे.त्यामुळे नदीकाठचे कारखाने आणि जलप्रवाह दूषित करणाऱ्या घटकांवर राज्याचे प्रदूषण महामंडळ काय कारवाई करणार असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

कृष्णा,पंचगंगा,मुळा-मुठा,गोदावरी,तापी नद्यांच्या स्वच्छतेसाठी 1182.86 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती जुलै 2022 साली केंद्रीय राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी दिली होती.मंजूर निधी पैकी 214.19 कोटी रुपयांना निधी राज्य सरकारकडून खर्च अपेक्षित होता.मात्र या पातळीवर सरकारने पुढे काय कारवाई केली हे समजायला मार्ग नाही.
जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय.जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे.नदी आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.मात्र अलीकडील काळात याचा वापर न होता.रासायनिक घटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.परिणामी नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.गोदावरी आणि तिला येऊन मिळणाऱ्या नद्या त्याला अपवाद नाही.गोदावरी नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे.गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी पानवेलीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.तर काही ठिकाणी गटार आणि नाल्याचे पाणी नदी पात्रात सोडले जात असल्याने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहेत.मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिकच्या गोदावरी नदीबद्दल काही वर्षापूर्वी एक अजब दावा केला होता.गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ असल्याचे आकडेवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केली होती.त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी या दाव्या बाबत शंका उपस्थित केली होती.नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबक येथून उगम पावणारी गोदावरी नदी उत्तरोत्तर आणखी दूषित होत जात आहे.सन-2015 साली कोपरगाव शहरालगत असलेल्या नगर-मनमाड मार्गावर मोठ्या पुलाच्या खाली नदीच्या पाण्यात असलेले मासे मृत आढळून आले होते.

“कोपरगाव येथे गोदावरी नदीला नारंदी,गारदा,आदी नद्या येऊन मिळतात.त्यांनी नद्या सोबत गोदावरी कालव्यांचे पाणी तपासणीसाठी शासकीय प्रयोग शाळेत दिले होते.त्याचा अहवाल त्यांना नुकताच मिळाला असून त्यात त्यांना गोदावरी नदीत लहान पुलाजवळ असणाऱ्या पाण्यात अनेक अनिष्ट घटक आढळून आले आहे.नारंदी नदीचे पाणी म्हणजे दारूचं.विशेष म्हणजे त्यात त्यांनी संजीवनी कारखाना,गोदावरी दूध संघ,संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे महाविद्यालय,औद्योगिक वसाहत आदीं घटक जबाबदार आहे.याबाबत आपण प्रदूषण महामंडळाकडे तक्रार करणार आहे”-संजय काळे,सामाजिक कार्यकर्ते,कोपरगाव.
दरम्यान त्याबाबत तत्कालीन शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता.त्यावेळी दै.गावकरीतून त्याला मोठी प्रसिद्धी आमच्या प्रतिनिधीने दिली होती.आता पुन्हा एकदा हा जल प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अर्थातच त्याबाबत कोपरगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी गोदावरी नदी आणि तिला कोपरगाव शहरानजीक येऊन मिळणाऱ्या नद्यांचे पाणी प्रयोग शाळेत तपासून त्याची गुणवत्ता तपास असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कोपरगाव येथे गोदावरी नदीला नारंदी,गारदा,आदी नद्या येऊन मिळतात.त्यांनी नद्या सोबत गोदावरी कालव्यांचे पाणी तपासणीसाठी शासकीय प्रयोग शाळेत दिले होते.त्याचा अहवाल त्यांना नुकताच मिळाला असून त्यात त्यांना गोदावरी नदीत लहान पुलाजवळ असणाऱ्या पाण्यात अनेक अनिष्ट घटक आढळून आले आहे.नारंदी नदीचे पाणी म्हणजे दारूचं असा दावा त्यांनी केला आहे.विशेष म्हणजे त्यात त्यांनी संजीवनी कारखाना,गोदावरी दूध संघ,संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे महाविद्यालय,औद्योगिक वसाहत आदींना जबाबदार धरले आहे.परिणामी ही पाणी शेतात आणि शेतातील पिकातून जीवनात्राच्या पोटात जात असून आगामी काळात कोपरगाव शहर आणि तालुका कॅन्सरचे आगार ठरणार असल्याचे भाकीत व्यक्त केले आहे.आणि त्याला कारण म्हणजे निवडणुकीत मतदार हा मत पेटीत टाकताना हजार पाणी पाचशे रुपयांना बळी पडत असल्याचा रास्त आरोप केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांना जागे होण्याची वेळ आली असल्याचे सांगून सुशिक्षित तरुणांना जागे होण्याचे आवाहन केले आहे.

नद्यांचे पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.पूर्वीच्या काळात आपण दात घासण्यासाठी दंतमंजन,खडीसाखर,किंवा माती,आंघोळीसाठी उटणे,दूध,डाळीचे पीठ,आणि भांडी-टॉयलेट साफ करण्यासाठी सोडा,लिंबू,राख यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरत होतो.या गोष्टींचा वापर केल्याने पाण्यात रासायनिक प्रदूषण होत नाही आणि निसर्गाला हानी पोहोचत नाही.
गोदावरीच्या वाढत जाणार्या प्रदूषणामागे अनेक कारणे उघड झाली आहेत.पाणीटंचाईमुळे गोदावरीच्या मूळ प्रवाहालाच घातला गेलेला बांध,मुख्य प्रवाहातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांमुळे पात्राचा झालेला संकोच व त्यात लाखो लिटर सांडपाण्याचा दररोज येणारा प्रवाह यामुळे पवित्र गोदावरीची गटारगंगाच झाली आहे.त्यावर उपाय म्हणून प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाठवलेला गोदावरी कृती आराखडा तब्बल काही वर्षांपासून शासनदरबारी भिजत पडला असून,गोदावरी गटारीकरणविरोधी मंचसारख्या सामाजिक संस्था उच्च न्यायालयात गेल्यानंतर केवळ सफाईसारख्या योजनांवर भर दिला जात असला तरी प्रदूषणाला हातभार लावणार्या मुख्य स्रोतांकडे मात्र दुर्लक्षच झाले आहे.

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय.जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे.नदी आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.पूर्वीच्या काळात आपण दात घासण्यासाठी दंतमंजन,खडीसाखर,किंवा माती,आंघोळीसाठी उटणे,दूध,डाळीचे पीठ,आणि भांडी-टॉयलेट साफ करण्यासाठी सोडा,लिंबू,राख यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरत होतो.या गोष्टींचा वापर केल्याने पाण्यात रासायनिक प्रदूषण होत नाही आणि निसर्गाला हानी पोहोचत नाही.



