जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या ठिकाणी दोन गटात मारहाण,गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत ग्रामस्थांची धाव!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास एका स्थळाजवळ एक इसमास मारहाण झाल्याने दोन गटात मोठा वाद निर्माण झाला असून त्यामुळे संतप्त गटाने आज उशिरा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन ०५ आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून पोलिस ठाण्याच्या समोरच धरणे धरले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहाजापूर,सुरेगावसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.

शहाजापूर ठिकाणी पूजा अर्चा करणाऱ्या एका समाजाच्या इसमास काही (म्हणजेच पाच ) तरुणांनी मारहाण केली असल्याची बातमी आहे.एवढ्यावर हे प्रकरण थांबले असते तर बरे झाले असते मात्र ते तेवढ्यावर थांबले नाही.यातील काही तरुण सुरेगावात गेल्यावर त्यांचेवर दुसऱ्या गटाने हल्ला चढवला असल्याची बातमी आहे.असे तीन हल्ले एकमेकावर झाले असल्याची माहिती आहे.

  अलीकडील काळात धर्म आणि त्यांचे अनुयायी यांचे संघर्ष टोकदार होताना दिसत असून किरकोळ कारणावरून संघर्ष होताना दिसत आहे.त्यात जनसामान्य नागरिक नाहक भरडताना दिसत आहे.त्यामुळे एरव्ही गावातील
शांत असणारे वातावरण तापताना दिसत आहे.आज अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर या ठिकाणी उघडकीस आली आहे.यातील ठिकाणी पूजा अर्चा करणाऱ्या एका अल्पसंख्याक समाजाच्या इसमास काही (म्हणजेच पाच ) तरुणांनी मारहाण केली असल्याची बातमी आहे.एवढ्यावर हे प्रकरण थांबले असते तर बरे झाले असते मात्र ते तेवढ्यावर थांबले नाही.यातील काही तरुण सुरेगावात गेल्यावर त्यांचेवर दुसऱ्या गटाने हल्ला चढवला असल्याची बातमी आहे.असे तीन हल्ले एकमेकावर झाले असल्याची माहिती आहे.परिणामी संतप्त दुसऱ्या गटाने याबाबत न्याय मिळण्यासाठी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यास ही माहिती कळवली होती.असा त्यांचा आक्षेप आहे.मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी मोठा जमाव घेऊन तालुका पोलिस ठाण्यावर चाल करून न्याय मागितला असल्याचे वृत्त असून हा जमाव अद्याप तेथेच तळ ठोकून आहे.आता आगामी काही कालखंडात पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

  दरम्यान या घटनेने दोन गटात मोठा तणाव निर्माण झालेला आहे.मात्र आज कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीसह निवासी इमारतीचे आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते उद्घाटन असल्याने सदर कारवाई टाळली असल्याचे बोलले जात आहे.सदर कार्यक्रम नुकताच पार पडल्याने उद्या दिनांक ०४ मार्च रोजी पोलिस अधिकारी ॲक्शन मोडवर येतील अशी चिन्हे असल्याचे बोलले जात आहे.

  दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या एका माहितीनुसार काल दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित इसमांना पोलिस ठाण्यात हजर होण्याचे फर्मान होते मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे उद्या याबाबत कडक कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close