जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…’त्या ‘ दुष्काळी गावांची पाण्याची प्रतीक्षा संपली !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   निळवंडेच्या संगमनेर येथील जलसंपदा विभागाने डी.वाय.04 उजवी आणि डाव्या वितरण व्यवस्थेचे काम अद्याप सुरू केलेले नव्हते याबाबत निळवंडे कालवा कृती समितीच्या प्रयत्नास यश आले असून या चारीचे डिझाइन मंजूर झाले असल्याची माहिती सि.डी.ओ.मेरी च्या नाशिक येथील अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती अध्यक्ष रूपेंद्र काले आणि कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी दिली आहे.त्यामुळे बहादरपूर आणि सायाळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान संगमनेर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायत हद्दीत पश्चिमेकडील गावातील 308 हेक्टर क्षेत्र वगळले होते.त्याबाबतही निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्याबाबत जलसंपदा विभागाने सदर प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.ग्रामपंचायतीने सदर काम बंद केले होते.त्याबाबत त्यांना विश्वासात घेऊन लेखी घेऊन मागील पंधरवड्यात काम सुरू केले आहे.त्याबाबत तानाजी शिंदे,भाऊसाहेब शिंदे,शिंदे गुरुजी आदींनी निळवंडे कालवा कृती समितीचे आभार मानले आहे.


    याबाबत सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीने उत्तर नगरसह नाशिक जिल्ह्यातील ०७ तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना निळवंडे धरणाचे प्रस्तावित पाणी मिळण्यासाठी रस्त्यावरील लढा केलाच पण खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे माध्यमातून केंद्रीय जल आयोगाकडून १४ मान्यता मिळवल्या होत्या तर उर्वरित मान्यतेसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात पत्रकार नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले आदींनी दुष्काळी शेतकऱ्यांना एकत्र करून कालवा कृती समितीच्या वतीने व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या विधी सहाय्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.त्यातून औरंगाबाद उच्च न्यायालयाने सन-२०१९ साली सदर कालव्याचे काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.ते मुदत वाढवून व जलसंपदाचे आर्थिक अधिकार गोठवून अखेर दि.३१ मे २०२३ रोजी निळवंडे लाभक्षेत्रातील बहुतांशी गावांना निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यात आले.तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून माजी खा.प्रसाद तनपुरे यांचे सहकार्याने सर्वाधिक निधी आणला होता.परिणामी बहुतांशी गावांना निळवंडे धरणाचे पूर पाणी मिळाले होते.मात्र जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,बहादरपूर आणि सिन्नर तालुक्यातील सायाळे,पाथरे,मलढोण आदी गावांना पाणी मिळाले नव्हते.याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काळे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे आदीसह पदाधिकाऱ्यांनी सातत्याने लेखी पाठपुरावा सुरू ठेवला होता.सातत्याने अहिल्यानगर,नाशिक आणि संगमनेर आदी जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी पाठपुरावा सुरू ठेवला होता.

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात वितरण व्यवस्थेचे सुरू असलेले काम.

   दरम्यान यात उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या मुख्य कालव्यांवरील उर्वरील संपूर्ण ६३ हजार १८१ हे. लाभक्षेत्र वितरण प्रणालीचे क्षेत्र पाईप लाइन वितरण (पी.डी.एन.)द्वारे सिंचनाखाली आणणे करिता ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून काम कार्यक्षेत्रावर प्रगतीत असले तरी आणि पावसाळा जवळ आला असताना जलसंपदा विभागाने डी.वाय.04 उजवी आणि डाव्या वितरण व्यवस्थेचे काम अद्याप सुरू केलेले नव्हते.त्यामुळे बहादरपूर आणि सायाळे परिसरातील शेतकऱ्यांत अंसतोष निर्माण झाला होता.याबाबत ही कामे या विभागाने तातडीने हाती घ्यावी अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,तानाजी शिंदे,न्यानेश्वर शिंदे गुरुजी,भाऊसाहेब शिंदे, यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली होती.त्याला यश आले असून जलसंपदा विभागाने सदर चारीचे डिझाइन मंजूर केले असून आता या चारीचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबत दुष्काळी असलेल्या बहादरपूर आणि सायाळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

   दरम्यान संगमनेर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायत हद्दीत पश्चिमेकडील गावातील 308 हेक्टर क्षेत्र वगळले होते.त्याबाबतही निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्याबाबत जलसंपदा विभागाने सदर प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.ग्रामपंचायतीने सदर काम बंद केले होते.त्याबाबत त्यांना विश्वासात घेऊन लेखी घेऊन मागील पंधरवड्यात काम सुरू केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close