जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

चर्मकार महासंघाचे कानडे यांना पुरस्कार

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे यांना चर्मकार समाजाकरीता केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात येणारा “संत रविदास समाजभुषण” पुरस्कार देऊन सिंधुदुर्ग आ.वैभव नाईक यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असुन त्यांचा असणारा विश्वास सार्थ ठरवत चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असतो यापुढेही रात्रंदिवस काम करण्याची ऊर्जा या पुरस्काराने मिळणार आहे”-दिलीप कानडे,विभागीय अध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ.

सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाच्या वतीने राज्यातील मान्यवरांना विविध परस्कारानी गौरविण्यात आले आहे.त्यात हा गौरव करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी आ.वैभव नाईक,सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव,कार्यध्यक्ष विजय चव्हाण,चंद्रसेन पठाडेअँड.अनिल नरवडेकर, रविकिशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलीप कानडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आ.भाऊसाहेब कांबळे,गटनेते नगरसेवक रविंद्र पाठक,जिल्हाध्यक्ष अशोक कानडे,जिल्हा संपर्क प्रमुख नगरसेवक अँड.संतोष कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग,तुषार पोटे,गणेश कानडे,देविदास कानडे,संजय पोटे,संतोष कानडे,संतोष शिंदे,अँड रमेश दुशिंग,माधवराव पोटे,सागर पोटे,सागर दळवी आदींनी अभिनंदन केले आहे

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close