गृह विभाग
…या शहरात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात सत्तांतर झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला असून त्यात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांची बदली झाली असून त्याआधी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची धुळे येथे बदली झाली असून त्यांचेसह तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचीही अकोले येथे बदली झाल्याने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र कुठपर्यंत सुरू राहणार असा सवाल निर्माण झाला आहे.

राज्य आणि केंद्रात आपल्या सोयीचे अधिकारी खुर्चीवर बसवण्याचा सत्ताधाऱ्यांचा आवडता खेळ आहे.सत्ताधारी वर्गाला अडचणीत आणणारे आणि नियमबाह्य कामे करण्यास अडचणी आणणारे तुकाराम मुंढेसारखे अधिकारी कोणालाही आवडत नाही.त्यामुळे हे होणार याचा अंदाज आधीच होता; त्याला फक्त दुजोरा मिळाला आहे इतकेच.शक्यतो कोपरगाव तालुक्यात आणि शहरात कोणी जबाबदार अधिकारी येण्यास शकतो सहज तयार होत नाही.कारण एका नेत्याने काम सांगितले की दुसरा लगेच ते बंद करण्याचा आदेश देतो.परिणामी अधिकाऱ्यांचा मधल्यामध्ये चटणी होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.परिणामी राज्यातील प्रशासनात कोपरगाव बदनाम झालेले असल्याचे आढळून येत आहे आणि असा गेली अनेक दशकांचा अनुभव आहे.
प्रशासनात व कामकाजात गतिमानता आणण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट केली जाते.काही महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची निवृत्ती किंवा बढतीमुळे रिक्त झालेली पदे भरण्यासाठी बदल्या केल्या जातात.काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते.राजकीय सोयीसाठी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय कामात सातत्य राहत नाही,भ्रष्टाचाराला वाव मिळतो आणि सुशासनाचे उद्दिष्ट धोक्यात येते.वारंवार होणाऱ्या या बदलांमुळे सामान्य नागरिकांची कामे रखडतात आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खचते.राज्याच्या गृह विभागाने यापूर्वी राज्यात ७८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.राजकीय दबावामुळे किंवा विशिष्ट सोयीसाठी होणाऱ्या बदल्यांमुळे लोकशाहीच्या मुल्यांचा ऱ्हास होतो,असे विविध न्यायालयीन निरीक्षणे आणि अहवालांमध्ये स्पष्ट झाले आहे.कोपरगाव शहरात याची चुणूक दिसून आली असून यात शहरातील विविध तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याचे उघड झाले आहे.यात मुख्यतः कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांची बदली अनेकांना धक्का देणारी असल्याचे मानले जात आहे.कोपरगाव नगरपालिकेत तीन महिन्यापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर त्यांची बदली होणार याचे संकेत मिळत होते.मात्र पहिल्या टप्प्यात सत्ताधाऱ्यांना सत्कार घेण्यात गेल्याने बदल्यांचा हंगाम संपून गेला होता.त्यामुळे ते निदान वर्षभर तरी जाणार नाही असे दिसत असताना आज त्यांच्या बदलीचा आदेश येऊन धडकला असल्याचे उघड झाले आहे.ईशान्यगडाचे कार्यकर्ते सत्तेत आल्यावर याचा दाहक अनुभव अधिकाऱ्यांना येत असतो.तो याही वेळा आला आहे.त्यात विशेष काही नाही.राज्य आणि केंद्रात आपल्या सोयीचे अधिकारी खुर्चीवर बसवण्याचा सत्ताधाऱ्यांचा आवडता खेळ आहे.सत्ताधारी वर्गाला अडचणीत आणणारे आणि नियमबाह्य कामे करण्यास अडचणी आणणारे तुकाराम मुंढेसारखे अधिकारी कोणालाही आवडत नाही.त्यामुळे हे होणार याचा अंदाज आधीच होता; त्याला फक्त दुजोरा मिळाला आहे इतकेच.शक्यतो कोपरगाव तालुक्यात आणि शहरात कोणी जबाबदार अधिकारी येण्यास शकतो सहज तयार होत नाही.कारण एका नेत्याने काम सांगितले की दुसरा लगेच ते बंद करण्याचा आदेश देतो.परिणामी अधिकाऱ्यांचा मधल्यामध्ये चटणी होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.परिणामी राज्यातील प्रशासनात कोपरगाव बदनाम झालेले असल्याचे आढळून येत आहे आणि असा गेली अनेक दशकांचा अनुभव आहे.मात्र यावेळी नवखा आणि तुलनेने माहिती नसलेला मासा गळाला लावला असल्याचे दिसून येत आहे.मध्यंतरी सत्ताधारी वर्गाने शंभर दिवसाचा आरसा दाखवला असला तरी त्यात काहीही तथ्यांश नाही.जवळपास दोन ते अडीच वर्षे सत्ताधारी वर्गाची दिशा समजण्यास सहज निघून जातात.त्यात शंभर दिवस काहीही नाही.नुकत्या पाठविण्यास ठराव घेणे ते बनवणे,त्यापुढील कार्यवाहीसाठी पाठवणे आणि त्याचा पाठपुरावा करण्यास व काम मंजूर करण्यात जवळपास एक ते दीड वर्ष सहज निघून जाते.लोकशाहीत मंद तथा धीमी निर्णय क्षमता हा मोठा दोष आहे.आणि त्याचा अनुभव अनेकाना आल्याशिवाय राहत नाही.त्यामुळे आगामी काळात आता आलेल्या अधिकाऱ्यास काम समजावून घेण्यास बराच कालावधी सहज निघून जातो.परिणामी कामाचा वेग मंदावतो.नवीन नगराध्यक्ष पराग संधान यांना याचा अनुभव आगामी काळात येणार आहेच.आणि येथील दोन गडामध्ये काम करण्यास येणाऱ्या अडचणी समजल्या तर बऱ्याच वेळा अधिकारी येथून काढता पाय घेतो असा अनुभव आहे असो.नवीन कोपरगावात येणारे नाशिक महापालिका उपायुक्त असलेले अजित निकत हे कोपरगाव येथील मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे जागी येत आहे.त्यांचे स्वागत आहे.तर मुख्याधिकारी सुहास जगताप यांना शुभेच्छा आहेत.

दरम्यान कोपरगाव शहरात आणि दोन बदल्या झाल्या असून त्या गृह विभागाशी संबंधित आहे.त्यात कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा समावेश आहे.त्यांची बदली धुळे यांच्या सोयीने झाली असल्याचे मानले जात आहे.त्यांचे जागी जळगाव येथून उद्धव दामले हे अधिकारी आले आहे.पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे शिर्डी येथून आले होते.सुरुवातीला कोणी सज्जन त्यांचे दालनात गेला तर हा अधिकारी भलताच कडक असल्याचा भास होत असे.मात्र काही काळ संवाद साधला की त्यामागील त्यांच्यातील माणूस सजग असल्याचे सहज लक्षात येत असे.त्यांचे बोलण्याची लकब सुरुवातील घाबरून सोडणारी होती.मात्र त्यानंतर थोड्यात वेळात त्यांचे माधुर्य माणसाला लक्षात येत असे परिणामी फणसासारखे त्याचे व्यक्तिमत्व असल्याचे कोणालाही जाणवत होते.त्यांच्या काळात गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला असल्याचे दिसून आले होते.गावठी कट्टे,रेशन घोटाळा,वाळू,मटका,गुटखा आदी अवैध धंदे आदींना बरकत आली होती.त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने बातम्या दिल्या की,” त्याचा बहुधा फटका त्यांना बसत असल्याचे वारंवार त्यांचे बोलण्यातून जाणवत असे.” आमच्या विरोधात लई बातम्या छापता बुवा तुम्ही” असा खानदेशी शेरा हमखास ऐकायला भेटायचा.परिणामी त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती.त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांची त्यांचेवर ऐतराजी झाली होती.त्याबाबत त्यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.त्यावेळेपासून कोपरगाव शहरात नवीन अधिकारी येणार असल्याचे सूतोवाच होत होते.जाता जाता त्यांनी एक काम बरे केले म्हटले तर वावगे ठरू नये.त्यांनी धारणगाव रोडवर असलेल्या अवैध व्यावसायिकांनी माजवलेला कहर नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना दाखवलेला हिसका कोपरगावकराना चांगलाच ध्यानात राहणार असल्याचे दिसत आहे.त्यांनी हा काठीचा धाक आधीच दाखवला असता तर त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले असते.त्यांची अवस्था,” देर आये,दुरुस्त आये” अशी झाली आहे.पण तोवर वेळ निघून गेली होती.आणि ते तसेही उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर बढतीवर असल्याने त्यांचे दहा बोटे तुपात गेले आहे तो बाग वेगळा आहेच.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांची या धडाक्यात बदली झाली आहे.त्यांनी आपल्या काळात अनेक गुन्ह्याचा तपास लावला होता.पण स्वभाव मितभाषी असल्याचे त्यांनी कोणताही गाजावाजा करून ढोल बडवून काम केले नाही.तालुक्यात अलीकडील काळात गुन्हेगारी वाढली त्याला तेही अपवाद नव्हते.मात्र एक काम कमी पण कोणाला उगीच उपद्रव करून त्यांनी उच्छाद मांडला असल्याचे व कोणाचा छळवाद केल्याचे दिसून आले नाही.किमान आमच्या प्रतिनिधी पर्यंत तरी तशा तक्रारी आल्या नाही हे विशेष ! “समाजात शांतता नांदण्यासाठी ज्या माणसाना संतांच्या संकेतांची भाषा कळत नाही.त्यांना पोलिसांच्या दांडक्याची आवश्यकता असते” असे जैन मुनी तरुण सागर महाराज यांनी लिहून ठेवले आहे.त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना धाक राहील असे वागळे तरी बरेच काही साध्य होऊ शकते हे यातून दिसून येत आहे.संदीप कोळी यांची बदली अकोले तालुक्यात झाली आहे.ते अगस्ती मुनींच्या सहवासात गेले असल्याचे दिसून आले आहे.



