जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

मद्य व्यवसायास परवाना देवु नये-कोपरगावात…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील पालिका हद्दीतील समतानगर,शिंगी शिंदे नगर व महात्मा फुले नगर येथे मोठया प्रमाणांत नागरी रहिवास असुन शेजारीच चर्च,कॉन्व्हेंट स्कुल असल्याने या भागात कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवु नये अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे या परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांचेसह नागरिकांनी केली आहे.

दरम्यान काही नागरिकांनी या मागणीचे स्वागत करताना तरी खाजगीत बोलताना तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रबळ समजल्या जाणाऱ्या काळे-कोल्हे या दोन्ही गटांनी तालुक्यात निवडणुकांत वाटप करण्यात येणारे मद्यही बंद करावे यातून बऱ्याच अंशी व्यसनमुक्तीस मदत मिळेल असा दुर्मिळ आशावाद व्यक्त केला आहे.

त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”पालिका हददीतील समतानगर,शिंदे शिंगीनगर व महात्मा फुले नगर येथे मोठया प्रमाणांत नागरी वस्ती असुन महाजन गोठयाजवळ नव्याने बिअर व वाईन शॉपी सुरू करण्यांबाबतचे प्रकटन काढण्यात आले आहे.त्यामुळे या भागातील रहिवाश्यांना मोठया प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.या सर्व रहिवासीयांनी एकत्रीतरित्या यास सक्त विरोध दर्शवुन सुमारे अडीचशे रहिवासी मंगळवारी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना समक्ष भेटले असून त्यांना याबाबतची सर्व स्थिती समजावुन सांगितली व याठिकाणी कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवु नये म्हणून विरोध दर्शविला आहे.

सदर जागेवर मद्य व्यवसायास परवानगी दिल्यास त्यातून तरूणपिढीमध्ये व्यसनाधिनता वाढुन गोर गरीब जनतेचे संसार प्रपंच उध्वस्त होणार आहे.मद्यपींचा त्रास महिला भगिनीसह शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोठया प्रमाणांत जाणवणार आहे.हा संपुर्ण परिसर नागरी रहिवास वस्तीचा असुन शेजारीच चर्च,कॉन्व्हेंट स्कूल आहे.त्यावरही विपरीत परिणाम होवुन येथील शांतता धोक्यात येवुन कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.तेंव्हा नागरिकांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून सदर ठिकाणी कुठल्याही मद्य व्यवसायास परवाना देण्यांत येवु नये असेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे त्यावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close