जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात सैनिकांना हि वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न सुरु-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सैनिकांना निवृतीनंतर देखील अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कटिबद्ध त्यांच्या मागणीनुसार कोपरगावमध्ये सैनिक भवन उभारण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलता केले आहे.

“कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात देशसेवा पूर्ण केलेले व सध्या देशसेवा करीत असलेल्या आजी माजी सैनिकांची संख्या खूप मोठी आहे.या आजी माजी सैनिक एकत्र येवून निवृत्तीनंतरही तालुक्यात त्यांच्याकडून समाजसेवा करण्यासाठी प्रयत्न होतील”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव येथील महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन सभागृहात ‘एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन कोपरगाव’ या संघटनेच्या ७ व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे होते.

सदर प्रसंगी सदर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,व्यापारी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा,संदीप रोहमारे,सुधा ठोळे,श्री वीसपुते,एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे,उपाध्यक्ष मारुती कोपरे,सचिव भाऊसाहेब निंबाळकर,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,रावसाहेब वल्टे,शांतीलाल होन,अॅड.योगेश खालकर आदी मान्यवरांसह एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात देशसेवा पूर्ण केलेले व सध्या देशसेवा करीत असलेल्या आजी माजी सैनिकांची संख्या खूप मोठी आहे.या आजी माजी सैनिक एकत्र येवून निवृत्तीनंतरही समाजसेवा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील.यासाठी या सर्व आजी माजी सैनिकांच्या मागणीनुसार सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असून सर्व सैनिकांना निवृतीनंतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे,यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष मारुती कोपरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव भाऊसाहेब निंबाळकर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close