जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

जलवाहिनीचे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसवणार-दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभद्रानगर उपनगरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेकडून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू होणार आहे हे सुभद्रानगरच्या नागरिकांना माहित आहे मात्र शहरातील काही जण जनतेत संभ्रम निर्माण करत असून तो त्यांनी बंद करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे अनिरुद्ध काळे यांनी नुकतेच केले आहे.

“सुभद्रानगर मधील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी खराब झाल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता.त्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला नवीन पाईपलाईन टाकण्याच्या केलेल्या सूचनेनुसार जलवाहिनी टाकण्याचे काम वर्तमानात सुरू आहे.अगोदर पेव्हर ब्लॉक टाकायचे व पुन्हा जलवाहिनीचे कामासाठी पेव्हर ब्लॉक काढणे संयुक्तिक होणार नाही”-डॉ.अनिरुद्ध काळे,कोपरगाव.

काळे यांनी पुढे म्हटले आहे की,”सुभद्रानगर मधील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी खराब झाल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता.त्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला नवीन पाईपलाईन टाकण्याच्या केलेल्या सूचनेनुसार जलवाहिनी टाकण्याचे काम वर्तमानात सुरू आहे.अगोदर पेव्हर ब्लॉक टाकायचे व पुन्हा जलवाहिनीचे कामासाठी पेव्हर ब्लॉक काढणे संयुक्तिक होणार नाही त्यातून निधीचा अपव्यय होवून हा निधी जनतेच्या करातून जमा झालेला आहे.त्यामुळे या निधीचा पर्यायाने जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग होण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद जलवाहिनीचे काम पूर्ण होताच पेविंग ब्लॉक बसण्याचे काम सुरू करणार आहे.त्याबाबत कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.याची सुभद्रानगरच्या नागरिकांना माहिती असतांना काहीं जण राजकीय प्रतिमा उजळविण्यासाठी नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांनी सुभद्रानगर मध्ये विकास कामांचे भूमिपूजन होवून वर्षभरानंतर काम सुरू केले व रस्त्यावर खडीकरण झाल्यावर आठ महिन्यांनी डांबरीकरण केले त्याचा नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला त्याबाबत त्यांनी खुलासा नागरिकांना द्यावा.

सदरच्या पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या कामाची कार्यारंभ आदेश प्रसिद्ध झाला आहे.ज्यांच्यामुळे नागरिकांना मागील पाच वर्ष सातत्याने अडचणींचा सामना करावा लागला त्यांचा प्रसिद्धीसाठी प्रयत्न सुरू असून ते जनतेत संभ्रम पसरवत आहे असा दावा अनिरुद्ध काळे यांनी शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close