जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

मतदारांच्या विकासासाठी आपण सत्तेसोबत जाण्याचा घेतला निर्णय-खा.वाकचौरे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे देवमाणूस आहेत,त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही,परंतु शिर्डी लोकसभा मतदार संघाचे सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा प्रामाणिक निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे छायाचित्र.

दरम्यान कोपरगाव शहरात (उबाठा)शिवसेनेचे शहराध्यक्ष गगन हाडा,बाळासाहेब जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खा.वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त करून त्या निषेधार्थ त्यांचा पुतळा जाळून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून आपण खा.वाकचौरे यांना कोपरगाव शहरात प्रवेश करून देणार नाही अशी घोषणा केली आहे.त्यावेळी 13-14 तरुण उपस्थित होते.तीच बाब संगमनेर शहरात घडली आहे.त्यामुळे या घटनेबाबत मतदार संघात फार असा मोठा प्रतिकार असल्याचे दिसून आले नाही.

   देशाच्या लोकसभेत भाजपकडे सध्या २४० खासदार आहेत.तर,एनडीएकडे २९३ खासदार आहेत.भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश,महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसला होता.त्यावेळी जेडीयू,टीडीपी आणि जननायक जनता दलानं सत्ता स्थापनेस मदत केली होती.लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी दोन तृतियांश बहुमत लागते.लोकसभेतील ५४३ जागांनुसार ३६२ खासदारांची मतं आवश्यक असतात.त्यामुळं दोन तृतियांश बहुमताची आकडेवारी ३६० वर येते.टीएमसीच्या २० खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे ०६ खासदार फुटणार हे स्पष्ट झालं होते.टीएमसीचे बंडखोर खासदार आणि ठाकरेंच्या सेनेचे फुटलेले खासदार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्यास खासदारांचं संख्याबळ ३१९ होते.दुसरीकडे एम के स्टॅलिन यांच्या द्रमुकसोबत एनडीएचा संपर्क असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे लोकसभेत २२ खासदार आहेत.तामिळनाडूच्या निकालानंतर द्रमुक आणि काँग्रेसमधील अंतर वाढलं आहे. २२ खासदारांनी एनडीएच्या बाजूला गेल्यास त्यांचं संख्याबळ ३४१ होतं.एनडीएला दोन तृतियांश बहुमतासाठी १९ खासदारांची गरज राहते.दरम्यान,तृणमूल काँग्रेस पक्षाचे २० खासदार फुटले आणि त्यांनी एनसीपीआयमध्ये विलीन होत असल्याचं जाहीर केलं होतं.त्या घडामोडी सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आज अखेर फुलते असल्याचे उघड झाले आहे.त्यांनी पक्षाच्या व्हिप फेटाळून लावला असल्याचे उघड झाले आहे.या खासदारात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,संजय जाधव,संजय देशमुख,नागेश पाटील आष्टीकर,ओमराजे निंबाळकर,संजय दिना पाटील आदींचा समावेश आहे.तर उद्धव ठाकरे गटात शिल्लक असलेले खासदार म्हणून अरविंद सावंत,अनिल देसाई,राजाभाऊ वाजे आदी तीन जण शिल्लक राहिले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे आता फुटीर गटाची फत्ते झाली असल्याचे जवळपास उघड झाले आहे.त्यांना आज रात्री मुंबईत आणले जाणार असल्याचे समजत आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डीचे खा.वाकचौरे यांचे प्रसिद्धी पत्रक बाहेर आले आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा निषेध व्यक्त करताना शिवसैनिक.

  त्यात त्यांनी म्हटलं आहे की,”ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले त्यांच्या वेदना कमी करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थ उरत नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरनगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पोहचविण्यासाठी यापुढे तळागाळात काम करणार आहे.प्रसार माध्यमातून माझी दिशाभूल करणारी व आर्थिक विषयक चुकीची बदनामी केली जात आहे,माझें कांही सहकारी रोष व्यक्त करत आहे परंतु लोकसभा मतदारसंघातील जनमत व शिवसैनिक माझ्या या निर्णयाशी सहमत आहे.मतदार संघाच्या विकासासाठी व निवडून दिलेल्या जनतेप्रति स्वच्छ हेतूने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला मान्य आहे.या निर्णयाचे मतदार बांधव व शिवसैनिक स्वागत करत आहे,आपण याबाबत लवकरच शिर्डीतील ताकद सिद्ध करू” असेही खा.वाकचौरे यांनी शेवटी म्हटले आहे.त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करताना शिवसैनिक गगन हाडा,बाळासाहेब जाधव आणि सहकारी.

   दरम्यान कोपरगाव शहरात (उबाठा)शिवसेनेचे शहराध्यक्ष गगन हाडा,बाळासाहेब जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खा.वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त करून त्या निषेधार्थ त्यांचा पुतळा जाळून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून आपण खा.वाकचौरे यांना कोपरगाव शहरात प्रवेश करून देणार नाही अशी घोषणा केली आहे.त्यावेळी १४-१५ तरुण उपस्थित होते.तीच बाब संगमनेर शहरात घडली आहे.त्यामुळे या घटनेबाबत मतदार संघात फार असा मोठा प्रतिकार असल्याचे दिसून आले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close