कोपरगाव शहर वृत्त
होड्या सोडणाऱ्यांनी आता खड्डे बुजवावे…या नगरसेवकाची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रभाग क्रमांक ०८ मधील निकृष्ठ दर्जाच्या झालेल्या धारणगाव-कोपरगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून दुर्दैवाने जर अपघातात एखाद्या निरपराध व्यक्तींचा बळी जावू शकतो त्यामुळे धारणगाव-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी करून मागील वर्षी रस्त्यात होड्या सोडणारे सत्तेत बसले असल्याने त्यांनी आता या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी माफक अपेक्षा राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी केली आहे.

कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते.या रस्त्यावरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असून या स्मारकाच्या समोर देखील खड्डे पडलेले आहेत.या रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी दोन कोटी निधी दिला असून या रस्त्याचे काम सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने आपल्या हस्तकाकरवी केले असून करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.
कोपरगाव शहरातील संजयनगर,सुभाषनगर,टिळकनगर परिसरातील अत्यंत महत्वाचा आणि गजबजलेला रस्ता म्हणून धारणगाव-कोपरगाव रस्त्याकडे पाहिले जाते.कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते.या रस्त्यावरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असून या स्मारकाच्या समोर देखील खड्डे पडलेले आहेत.या रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी दोन कोटी निधी दिला असून या रस्त्याचे काम सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने आपल्या हस्तकाकरवी केले असून करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.त्यामुळे काम होवून काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत कोपरगाव नगरपरिषदेला विचारणा देखील करण्यात आली होती.परंतु कोपरगाव नगरपरिषदेने त्याची दखल घेतली नाही व आता तर ज्यांनी या रस्त्याचे काम घेतले होते तेच सत्तेत जावून बसले आहेत त्यामुळे या निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याची चौकशी होईल याची आशा कोपरगावच्या नागरीकांनी सोडलेली आहे.परतू कमीत कमी या रस्त्यावर पडलेले खड्डे तरी बुजवावे अशी माफक अपेक्षा कोपरगावच्या जनतेच्या वतीने नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे.
दरम्यान मागील पावसाळ्यात याच खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून आंदोलन करणारे आता सत्तेत आहेत.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना निधी देण्यात दुजाभाव करून आमची जिरवण्याच्या नादात कोपरगावच्या जनतेची जिरवू नका आणि धारणगाव-कोपरगाव रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये अपघात होवून एखाद्या निरपराध नागरीकाचा जीव जायची वाट न पाहता तातडीने खड्डे बुजवा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा ईशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी कोपरगाव नगरपरिषदेला शेवटी दिला आहे.



