जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी परिसरात…या पिकांची जास्त लागवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कुंभारी (गहिनीनाथ घुले)

कोपरगाव तालुक्यातील गोदावरीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कुंभारी धारणगाव,माहेगाव,हिंगणी, मुर्शतपुर,मळेगाव,सोनारी,कोळपेवाडी परिसरात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने गव्हासह कांदा,मका, हरभरा या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याचे एकूण चित्र दिसत आहे थंडीचे गावाला या सर्व पिकांना वाढती थंडी पोषक असल्याने या पिकाचे चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

दरम्यान असे असले तरी शेतमजुराची वाढते भाव बी बियाणे व औषधाचे साहित्य याचे वाढते दर इंधनाच्या वाढत्या भावामुळे शेती मशागतीची देखील भावात वाढ झाल्याचे दिसून येत असताना शेती उत्पादन व आर्थिक बाजू याचा समतोल रक्तांना शेतकऱ्यांना दमछाक होत असल्याचे काही चित्र दिसून येत आहे.

मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने गोदावरीच्या नदीपात्रात अजूनही पाणी टिकून आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पिक पाण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती शेतीसह इतर पिकांकडेही लक्ष दिले असल्याचे काही चित्र दिसून येते गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी वेळेवर पाणी रासायनिक खते औषध फवारणी मशागत अशी जवळपास एकरी पंचवीस हजार रुपयांचा गव्हाच्या शेतीसाठी खर्च येतो जर एकरी गव्हाच्या उत्पादनात चांगला भाव मिळाला तरच शेती फायदेशीर ठरते नाहीतर शेती हा एक प्रकारे आतबट्याचा व्यवहार ठरत असल्याने शेतकऱ्यांची दुसरी पिढी मात्र शेती व्यवसाय फारसे लक्ष घालत नसल्यामुळे परंपरागत शेतकऱ्यांपुढे सुद्धा शेती उत्पादन घेताना अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कोव्हीड काळात जगाचे अर्थकारणाची चाक बंद झाली असताना शेती मशागत व शेती उत्पादन शेतकऱ्यांचे सुरू होते मात्र वाढते वीजदर यामुळे शेती उत्पादक शेतकऱ्यांपुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close