गुन्हे विषयक
…’त्या’कार्यकर्त्या विरुद्धही कोपरगावात गुन्हा दाखल,खळबळ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकत्याच संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडा वंदन प्रसंगी,”गुटखा खाऊन झेंडा वंदन करू नका” म्हणाल्याचा राग येऊन प्रहारचे तालुकाध्यक्ष यांनी कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील आरोपी तान्हाजी गोरख जाधव,विजय पंडितराव जाधव यांचेसह आठ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असताना काल फिर्यादी संदीप क्षीरसागर याचे विरुद्ध तेथील शिक्षिका श्रीमती मेघा कोंडीबा खंडांगळे यांनीं गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
फिर्यादी प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी झेंडा वंदन करण्यास अडथळा केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे विरोधी गट दुखावला गेला होता.त्यांनी आता संबंधित यांना पुढे करून हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल केला की अन्य कारणाने हे समजू शकले नाही.मात्र गुन्हा महिलेने सांगवी भुसार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झेंडा स्तंभा समोर हि घटना घडल्याचे म्हटले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,देशभरात २६ जानेवारी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातही तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला असताना सांगवी भुसार ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता तो शांततेत संपन्न झाला आहे.मात्र सांगवी भुसार हे गाव त्याला अपवाद झाले आहे.त्या ठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला आहे.फिर्यादी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी आरोपी तान्हाजी जाधव यांचेसह नेमक्या २६ जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण प्रसंगी सकाळी ९.१० वाजेच्या सुमारास आरोपी तान्हाजी जाधव,विजय जाधव,विलास कासार जाधव,किशोर बबन जाधव,हरिभाऊ शिंदे,साहेबराव जाधव,भाऊसाहेब संपत जाधव,सुनील प्रभात बंदे यांचेसह आठ जणांनी गुटखा खाऊन झेंडा वंदन करण्यास हरकत घेतली होती.त्यावरून अपमान झाल्याने फिर्यादी क्षीरसागर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे विरोधी गट दुखावला गेला होता.त्यांनी आता महिलेला पुढे करून हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल केला की अन्य कारणाने हे समजू शकले नाही.मात्र गुन्हा महिला शिक्षिका श्रीमती मेघा खंडांगळे (वय-५३) यांनी सांगवी भुसार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झेंडा स्तंभा समोर हि घटना घडल्याचे म्हटले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपण,प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना त्यावेळी आरोपी संदीप क्षीरसागर हा त्या ठिकाणी येऊन फिर्यादी शिक्षिका व साक्षिदार याना म्हणाला की,”तुम्ही अजून झेंडा वंदन का केले नाही ? असे म्हणून फिर्यादी व साक्षिदार यांना अंगावर धावून जाऊन शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणला आहे.
दरम्यान फिर्यादी महिलेच्या फिर्यादी वरून कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी उपसरपंच संदीप क्षिरसागर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिकारी सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.सुरेश बोटे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.६३/२०२३ भा.द.वि कलम ३५३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नीं.आव्हाड हे करत आहेत.