जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव तालुक्यात,’स्मार्ट सिटी’ सुरु करा-…या संघटनेची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या अर्थकारणाला गती देणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे नुकतेच लोकार्पण झाले असून त्याच मार्गावर असलेली ‘स्मार्ट सिटी’ भूसंपादन होऊनही का सुरु झाली नाही ? असा वास्तवदर्शी सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी सरकारला विचारला आहे.व सदर काम त्वरित सुरु करावे अशी मागणी तहसीलदार यांचेकडे केली आहे.

“समृद्धी महामार्गालगत २० नवनगरांची उभारणी करण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन अधिकाऱ्यानी केली होती.त्यापैकी ९ नवनगरांच्या उभारणीला प्रथम प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती दिली गेली होती.त्यासाठी भूधारकांचा त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकांऱ्यानी दिली होती मात्र वास्तवात हि नगरे तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी का सुरु केली नाही”-राजेंद्र झावरे,जिल्हा प्रमुख,उत्तर अ.नगर.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व वाजतगाजत करण्यात आले आहे.नागपूर येथील मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले होते.त्याचे कौतुक पुरे झाले असून आता या रस्त्यावर तरुणाईला रोजगार वाढण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ साठी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी केली आहे.

नागपूर-मुंबई या ७०१ किमी लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम कोरोनासारख्या संकटाच्या काळातही १६ भागांत सुरू होते या महामार्गावर १८ हजार कामगार राबत होते.आता या महामार्गालगत २० नवनगरांची उभारणी करण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन अधिकऱ्यानी व मंत्र्यांनी केली होती.त्यापैकी ९ नवनगरांच्या उभारणीला प्रथम प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती दिली गेली होती.त्यासाठी भूधारकांचा त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकांऱ्यानी दिली होती.मात्र आता पहिल्या टप्याचे उदघाटन संपन्न झाले असून आता रोजगार वाढण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी त्यानी केली आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे व धोत्रे आदी ठिकाणी हि नवनगरे प्रस्तावित होती.त्या ठिकणी काही कोपरगावातील पुढाऱ्यांनी मोठे भूखंडही विकत घेऊन आपल्या पुढील पिढ्यांची सोय केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले यावर कोणीही काहीही बोलत नाही.(या विषयावर आता उद्धव सेनेने आपली सत्ता गेल्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे हे विशेष !)

सदर निवेदनात त्यांनी सदर स्मार्ट सिटी रद्द करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.व सदर स्मार्ट सिटीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी दिल्या आहेत.त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.मात्र सदर सिटी मुळे आपल्याला रोजगार मिळेल त्या आशेवर सदर तरुण जगत होते.मात्र आता सरकारने सदर ठिकाणी पुन्हा ‘स्मार्ट सिटी’ सुरु करून तरुणांना रोजगार द्यावा अशी मागणी त्यानी केली आहे.

सदर निवेदनावर उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,वाहतूक सेना प्रमुख इरफान शेख,कोपरगाव शहर प्रमुख कलविंदर दडियाल,राहुल देशपांडे,सचिव बाळासाहेब साळुंके,वैभव गीते,कुकूशेठ साहनी,शिवसेना कोपरगांव प्रवक्ते सुनिल कुदांरे,उपशहर प्रमुख शेखर कोलते,उपशहर प्रमुख विकास शर्मा,मधु पवार,विभाग प्रमुख विक्रांत झावरे,सतीश शिंगाणे,वैभव गिते,बाळासाहेब लकारे,वसीम शेख,नरेश बैरागी,बाळासाहेब नरोडे आदींची नावे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close