संपादकीय
कामांच्या श्रेयातून चापुलसी करणाऱ्यांचा कोपरगावात महापूर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील रहदारीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा संभाजी चौक ते टाकळी नाका हा बहुप्रतिक्षेत असलेला रस्त्याच्या कामाला आज मुहूर्त लाभला असून आज त्याची सुरुवात मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत केली असल्याची माहिती नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने दिली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी कोपरगाव शहर आणि तालुक्यात,”कामांच्या श्रेयवादातून चापुलसी करणाऱ्यांचा महापूर येणे हि बाब दुर्दैवी व शिसारी आणणारी असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
कोपरगाव शहरातील ‘साईबाबा नाका ते गोदावरी पेट्रोल पंप’,बाजार समितीच्या समोरील रस्ता का सुरु होत नाही ? कोपरगाव बस आगारातील सिमेंट कॉंक्रिट कामास का वारंवार ठिगळे द्यावे लागतात ? तेथे धुळीच्या वावटळी का उठतात ? रेल्वे स्टेशन रस्ता का लगेच उखडला ? पोहण्याच्या तलावास काटेरी कुंपण का तयार झाले ? त्याला जबाबदार कोण ? त्याचा वापर का होत नाही.त्यावर विनाकारण खर्ची पडलेल्या निधीची जबाबदारी कोणाची याची चौकशी का होत नाही.”आय.टी.आय.इमारत आठ वर्षात का पूर्णत्वास जात नाही ? तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्ता का होत नाही ? त्याचा ‘केंद्रीय रस्ते विकास निधी’तून मंजूर झालेला ८९ कोटीचा निधी कोठे गेला ? आदी प्रश्नाला पिंडाला कावळा शिवत नाही तसे कोणीही शिवत नाही.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात व शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ दि.०६ एप्रिल रोजी राज्याचे उप्पमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,जिह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ,राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे,आदींच्या उपस्थितीत मोठा वाजतगाजत संपन्न झाला होता.त्यावेळी उपमुख्यमंत्री येणार म्हणून नगरपरिषद प्रशासनाने शहरातील विकास कामांना घाईघाईने सुरुवात केली होती.अनेक रस्त्यांना विना मंजुरी नसताना कामे करण्यात आले होते.रस्त्यातील खड्डे रातोरात नाहीसे झाले होते.त्या बाबत नगरपरिषदेच्या विकास कामांच्या वेगाचा अभूतपूर्व अनुभव नागरिकांनी घेतला होता.मात्र मंत्रिमंडळ येऊन गेले आणि प्रशासनाच्या कामाच्या पून्हा एकदा कासव गतीचा अनुभव येऊ लागला आहे.त्यामुळे आगामी काळात नगर परिषद निवडणूक असतानाही हि कामे वेगाने का होत नाही असा सवाल गंभीर निर्माण झाला होता.
दरम्यान या रस्त्याच्या कासव गतीमुळे या रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.या प्रलंबित व नादुरुस्त त्यांच्या दुकानात ग्राहक फिरेनासे झाले आहे.त्याचा नाहक फटका या व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे.त्यामुळे या भागातील उमेश धुमाळ आदी नागरिकांनी एक महिन्यापूर्वी एकत्र येऊन पालिका प्रशासनास निवेदन देऊन या प्रलंबित ‘रस्ता कामास’ गती देण्याची एकमुखी मागणी केली होती.त्या पाठोपाठ माजी नाराध्यक्ष मंगेश पाटील यांनीही हि मागणी केली होती.आता त्याची सुरुवात होणार याची कुणकुण सत्ताधारी वर्गास लागली असता त्यांनी बनाव सुरु करून,”आपणच त्या रस्त्याचे तारणहार आहोत” असा आभास निर्माण करण्याचे काम मनोभावे सुरु केले आहे.त्याचा अनुभव नुकताच कोपरगाव वासीयांना आला आहे.यापूर्वीही भाजप आमदारांच्या काळात याची शिसारी आणणारी अनुभूती नागरिकांना आलेली आहे.त्यांचाच कित्ता सध्याचे आमदार गिरवत असल्याचे दिसत आहे.आगामी नगरपरिषद निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणूक पाहून या कृतीला आणखीच चेव आला आहे.
कोपरगाव शहरातील ‘साईबाबा नाका ते गोदावरी पेट्रोल पंप’,बाजार समितीच्या समोरील रस्ता का सुरु होत नाही ? कोपरगाव बस आगारातील सिमेंट कॉंक्रिट कामास का वारंवार ठिगळे द्यावे लागतात ? तेथे धुळीच्या वावटळी का उठतात ? रेल्वे स्टेशन रस्ता का लगेच उखडला ? पोहण्याच्या तलावास काटेरी कुंपण का तयार झाले त्याला जबाबदार कोण ? त्याचा वापर का होत नाही.त्यावर विनाकारण खर्ची पडलेल्या निधीची चौकशी का होत नाही. “आय.टी.आय.इमारत आठ वर्षात का पूर्णत्वास जात नाही ? तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्ता का होत नाही ? त्याचा ‘केंद्रीय रस्ते विकास निधी’तून मंजूर झालेला ८९ कोटीचा निधी कोठे गेला ? युती शासनाच्या काळातील प्रादेशिक पाणी पूरवठा योजना अद्यापही का पूर्णत्वास जात नाही ? आदी प्रश्नाला पिंडाला कावळा शिवत नाही तसे कोणीही शिवत नाही आणि शिवणार नाही.तालुक्यातील गोदावरी कालव्यांना जलसंपदाचे शेतीला आवर्तन सुटणार हि खबर जलसंपदात बसलेल्या एखाद्या खबऱ्याने दिली की,त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयातून कुठलाही उशीर न करता या बातम्या आवर्जून प्रसिद्धीस येतात.प्रत्यक्षात हे काम करणारे कोणीही सामाजीक कार्यकर्ते असतात,किंवा कोणी तरी संघटना त्यांचे कार्यकर्ते स्वतःच्या खिशाला चाट लावून कार्यरत असतात.त्यांचेकडे त्याचे सप्रमाण पूरावेही असतात मात्र चापुलसी करणारे व बेगडी वर्तन करणारे विदूषक वर्तमानात जास्त झाले असून त्यांनी शहर आणि तालुक्याला नको-नको आणली आहे.याला शहर आणि तालुक्यातील मतदारांनी चाप लावण्याची वेळ आली आहे हे नक्की !