जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…आता सर्व साधारण सभेत फैसला !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दि.२२ रोजी सुरू केलेल्या  धरणे आंदोलनास नगरपरिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोजकुमार पापडेजा भेट देऊन सदर विषय हा आगामी 25 जून रोजी संपन्न होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवणार असल्याने त्यास तात्पुरती स्थगिती दिली असल्याने आज आंदोलनकर्त्यांनी आपल्या आंदोलनास अर्धविराम दिला असल्याची माहिती गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी दिली आहे.

आंदोलनस्थळी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज पापडेजा निवेदन स्वीकारतानाचा क्षण.

“राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाची दखल आज कोपरगाव नगरपरिषदेने घेतली आहे.आज दुपारी 2.30 वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्यकारीकारी अधिकारी मनोजकुमार पापडेजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असून आंदोलन कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.त्यात त्यांनी या विषयावर पालिका येत्या 25 जून रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विषय चर्चेसाठी ठेवला असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे धरणे आंदोलन आज स्थगित केले आहे”-गौरी पहाडे,गट नेत्या,राष्ट्रवादी अजित पवार गट.

    याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने केलेली अवाजवी घरपट्टी वाढ हा शहरात अत्यंत गंभीर व संवेदनशील विषय बनला असल्याचे दिसून आले आहे.वाढीव कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक,ज्येष्ठ नागरिक व मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडते या शिवाय त्यांचे कंबरडे मोडते त्यामुळे कोपरगाव शहर परिसरात पालिकेविरुद्ध नाराजी पसरली होती.हा अन्याय दूर करण्यासाठी व या घरपट्टी विरुद्ध नगरपरिषदेने दि.06 जुलै 2026 पर्यंत आपल्या लेखी तक्रारी नोंदवण्यासाठी आवाहन केले होते.त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने निषेध नोंदवला होता व त्या विरोधात काल सकाळपासून रणशिंग फुंकले होते.त्यासाठी हरकती नोंदविण्यासाठी आंदोलनस्थळी आक्षेप नोंदविण्यासाठी मदत कक्ष सुरू केला होता. त्याला नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसून आला होता.त्याची दखल आज कोपरगाव नगरपरिषदेने घेतली असल्याचे दिसून आले आहे.आज दुपारी 2.30 वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्यकारीकारी अधिकारी मनोजकुमार पापडेजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असून आंदोलन कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.त्यात त्यांनी या विषयावर पालिका येत्या 25 जून रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विषय चर्चेसाठी ठेवला असल्याची माहिती दिली आहे.त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विषय जर सर्वसाधारण सभेत ठेवला आहे तर मग थेट नागरिकांना पट्ट्यांचे वितरण का केले ?  असा सवाल केला आहे.त्यावर हा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर केल्याविना नागरिकांना घर पत्त्यांचे वितरण करू नये असे आवाहन केले आहे.ते नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.त्यामुळे आगामी 25 जून रोजी सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप कोल्हे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात पुन्हा एकदा रणकंदन होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष आगामी काळात संपन्न होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लागले आहे.

दरम्यान या आंदोलनामुळे नागरिकांच्या भावनांना राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी वाट मोकळी करून दिली असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close