जाहिरात-9423439946
अर्थकारण

…या नेत्याचे कोपरगावात स्थानिक खरेदीस प्राधान्य !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


दिवाळीच्या खरेदीला कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी व व्यापाऱ्यांनी देखील माफक दर व ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

वर्तमान ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे फेकणे सुरू झाले आहे.ऑफरच्या नावाखाली एखादी लिंक ओपन केल्यास एका झटक्यात ग्राहकाचे बँक खाते खाली होऊ शकते.त्यामुळे ऑनलाइन खरेदीतून फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.दिवसेंदिवस ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचे फॅड वाढत आहे ते टाळून स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे बनले आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

दिवाळीचा सण तोंडावर आला असून,अनेक लोक खरेदीचा बेत आखत आहेत.ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे फेकणे सुरू झाले आहे.ऑफरच्या नावाखाली एखादी लिंक ओपन केल्यास एका झटक्यात बँक खाते खाली होऊ शकते.त्यामुळे ऑनलाइन खरेदीतून फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.दिवसेंदिवस ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचे फॅड वाढत आहे.बाजारपेठेत जाण्यापेक्षा एका क्लिकवर मिळणाऱ्या वस्तूंवर ग्राहक भाळत आहेत.ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा ऑनलाइन फ्रॉडर्सकडून घेतला जात आहे.सध्या खरेदीसाठी आकर्षित केले जात आहे.मात्र या खरेदीतून स्थानिक व्यापारी नागवला जात असून त्यातून फसवणुकीचा धोका वाढला आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव शहर व्यापारी महासंघाने या पूर्वी जनजागृती करून पाहिली आहे.मात्र त्याला राजकीय वरदहस्त नसल्याने त्यात त्यांना फारसे यश आले नव्हते.मात्र हा गंभीर मुद्दा नुकताच आ.काळे यांनी गांभीर्याने घेतला असून त्या साठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला घेऊन थेट बाजारपेठ गाठली असल्याचे दिसून आले आहे.या मागे खरेदी किती आणि स्टंट किती हा भाग वेगळा असला ती यातील जंगरुती महत्वाची ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी आणि नागरिक यांनी व्यक्त केली आहे हि नसे थोडकी.

अनेक नागरिक खरेदीसाठी शेजारच्या तालुक्यात जातात.त्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी ग्राहक खरेदीसाठी येईल या भरोशावर खरेदी केलेल्या मालाची अपेक्षित विक्री होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यासाठी नागरिकांनी स्थानिक बाजार पेठेतच खरेदी करावी जेणेकरून कोपरगाव तालुक्यातील पैसा कोपरगाव तालुक्यातच राहून बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

“यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे.शेतकरी वर्ग अडचणीत आहे.मात्र कितीही अडचण असली तरी शेतकरी दिवाळी सण साजरा करतात.त्यामुळे व्यवसायिकांनी देखील दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून जास्तीचा नफा न कमविता माफक दरात आपल्या मालाची विक्री करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे आवाहन शेवटी आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.दरम्यान आपण कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील दिवाळीची खरेदीसाठी इतर तालुक्यात न जाता स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी यासाठी कर्मचाऱ्यांना आवाहन करू असे आश्वासन आ.काळे यांनी दिले आहे.

दरम्यान यावेळी चैताली काळे यांनी देखील व्यापारी बांधवांशी संवाद साधला.नागरिकांना स्थानिक बाजारपेठेतच दिवाळी सणाची खरेदी करण्याचे आवाहन करून स्वत: त्याची प्रत्यक्षात कृती करतांना आ.काळे यांनी पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या समवेत प्रत्यक्ष खरेदी देखील केली आहे. 

यावेळी सुधीर डागा,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,मन्नु कृष्णाणी,दिपक विसपुते,सुनील बोरा,गुलशन होडे,प्रदीप साखरे,सचिन ठोळे,तिलक अरोरा,अनिकेत भडकवाडे,रोहित काले,शाम लोंगाणी,अनुप पटेल,सचिन भडकवाडे,संतोष भट्टड,संकेत पारखे,मिलिंद जोरी,जय बोरा,अतुल धाडीवाल,तरुण भुसारे,किरण शिरोडे,राहुल हंसवाल,उमेश वाणी,रोहित काले,विधित जोशी,अभिनंदन शिंगी,सोनी महावीर,धनंजय सावजी,ओंकार भट्टड,जयेश डागा,वाल्मिक शुक्ला,प्रतिक पाटील,हर्षल कृष्णाणी,सेवासींग सहानी,नसिर पठाण, रविंद्र देवरे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,कृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी,अजीज शेख,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,चंद्रशेखर म्हस्के,सुनील शिलेदार,बाळासाहेब रुईकर,प्रशांत वाबळे,मनोज नरोडे,शैलेश साबळे,ऋषीकेश खैरनार आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close