जाहिरात-9423439946
अर्थकारण

कोपरगावात…या दिवशी संपन्न होणार एक्स्पो-२०२४

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी महाशिवरात्रीचे औचित्य साधून कोपरगाव शहरात ‘लायन्स,लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित व कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रायोजित  ‘एक्स्पो-२०२४” दि.०७ ते ११ मार्च रोजी संपन्न होत असून त्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबचेमाजी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

    ”जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने कोपरगाव शहरात महिलांची दुचाकी फेरी आयोजित केली असून सदर ठिकाणी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.महिलांना या कार्यक्रमास मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याने या उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा”-डॉ.वर्षा झंवर,महिला आहार तज्ञ,कोपगाव.

कोपरगाव शहरात ‘लायन्स,लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित व कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रायोजित एक्स्पो-२०२४ दि.०७ ते ११ मार्च रोजी संपन्न होत असून त्या साठी लायन्स पार्क येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

“या एक्स्पोसाठी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह,संजीवनी उद्योग,महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्ट,गोदावरी दूध,समता नागरी पतसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे”-दिनार कुदळे,माजी नगरसेवक, कोपरगाव नगरपरिषद.

सदर प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष संदीप भट्टड, उपाध्यक्ष सचिव ,राजेश ठोळे,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,माजी नगरसेवक दिनार कुदळे,मंदार
पहाडे,सत्येन मुंदडा,डॉ.अनिरुद्ध काळे,डॉ.वर्षा झंवर,राम थोरे,आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ,लायन्सचे सदस्य बहू संख्येने उपस्थित होते.

या एक्सपोसाठी संजीवनी उद्योग,महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्ट,गोदावरी दूध,समता नागरी पतसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे.

   सदर प्रसंगी राम थोरे यांनी ,”या एक्स्पो निमित्त महिला रॅली,रक्तदान शिबिर,लहान,मोठा गट डान्स स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,अंताक्षरी,व शेवटच्या दिवशी विजेत्यांचा पुरस्कार वितरण संपन्न होणार असल्याची माहिती दिली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेश ठोळे यांनी सन-२०१२ साली याचा शुभारंभ केला होता यावर्षी बाराव्या वर्षात पदार्पण केले असून यावर्षी विविध बँका सह डॉमिनो पिझ्झा सह ११० स्टॉल आहे.बचत गट,खाद्य पदार्थ आदींचे आयोजनासह बारा ज्योतिर्लिंग प्रदर्शन आयोजन केले असल्याची माहिती दिली आहे.महिलांना यात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
तर माजी नगरसेवक दिनार कुदळे,मंदार पहाडे,
यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे तर सुत्रसंचलं प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी केले आहे.या एक्स्पो बाबद यांनी माहिती दिली व कार्यक्रम पत्रिकेचे उपस्थितांचे शुभ हस्ते प्रकाशन केले आहे तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक सत्येने मुंदडा यांनी मानले आहे.

    ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने महिलांची दुचाकी फेरी आयोजित केली असल्याची माहिती डॉ.वर्षा झंवर यांनी दिली आहे.सदर प्रसंगी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती देऊन या उपक्रमांस महिलांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याने त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.झंवर यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close