जाहिरात-9423439946
अपारंपरिक ऊर्जा विभाग

सौर ऊर्जा ठरले दिवास्वप्न,शेतकऱ्यांचे बिबट्यांपुढे लोटांगण !

न्यूजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

    राज्यातील सौर प्रकल्पांच्या माध्यमातून स्वस्त शेतकऱ्यांना दिवसा,तसेच आणि उद्योग-व्यवसायांना वीजपुरवठा मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री कृषी वाहिनी २.०’ योजना रखडली असून तो सरकारचा फुसका बार ठरला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे पोहेगाव-१ आणि पोहेगाव-२ विद्युत उपकेंद्रामधील गावांना अद्याप दिवसा वीज मिळू शकली नाही यामुळे बिबट्याच्या भीतीच्या सावटात शेतकऱ्यांना आपला जीव जोखमीत घालून रब्बी पिकांना पाणी द्यावे लागत असून सौर ऊर्जा हे शेतकऱ्यांना दिवास्वप्न ठरले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.

सौर प्रकल्प छायाचित्र.

“विधानसभा निवडणुकीच्या आधी शहा येथील १३२ के.व्ही.ए.उपकेंद्राचे जोरदार ढोल ताशे वाजवून उद्घाटन करण्यात आले मात्र एक वर्षे उलटूनही अद्याप या उपकेंद्राची वीज शेतकऱ्यांना दिवास्वप्न ठरले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जीव धोक्यात घालून आपल्या रब्बी पिकांना पाणी देण्यास जावे लागत आहे.त्यात टाकळी फाटा आणि येसगाव सारखी जीवावर बेतणारी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?-बाबासाहेब गव्हाणे,ज्येष्ठ कार्यकर्ते निळवंडे कालवा कृती समिती.

    सदरचे सविस्तर वृत्त असे की,”योजनेचा दोन वर्षांचा कालावधी होऊनही २० टक्के उद्दिष्टही पूर्ण झाले नाही.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० च्या माध्यमातून ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५ ते १० किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित करण्यात येणार होते.असे सुमारे १७ हजार मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प राज्यभरात सुरू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते.मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही केवळ २० टक्के म्हणजे ३ हजार ३०० मेगावॉट क्षमतेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार मुदतीत पूर्ण होणाऱ्या सौर प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून प्रति मेगावॉट १.०५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.त्यानुसार मार्च २०२४ मध्ये ९,१५६ मेगावॉट क्षमतेच्या २ ‘राज्य सरकारकडून कंत्राट मिळालेल्या कंपन्यांना सौर योजनेचे २० टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाल्याने या प्रकल्पाला विलंब कशामुळे झाला हा सवाल निर्माण झाला आहे.? प्रकल्पांसाठी गावोगावी जमीन देण्यात येणार होती.मात्र,महसूल विभागातून भूसंपादनात खूप मोठे अडथळे येत आहे.तो अडथळा पार केला तरी पुढे अनेक ठिकाणी अनेक मंजुऱ्या मिळूनही खाजगी सौर कंपन्या अडेलतट्टूपणा करताना दिसत आहे.अनेक ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांकडून अडथळा आल्यामुळे जमीन मिळण्यास विलंब झाला.त्यातच तर वन विभाग,गायरानातील जमिनींचे परवाने मिळण्यास विलंब झाल्याने प्रकल्प रखडला असल्याची माहिती समोर आली आहे.त्याचबरोबर काही ठिकाणी नैसर्गिक संकटांमुळे प्रकल्प उभारण्यात अडचणी आली आहे.राज्यात हजार सौर प्रकल्पांसाठी काही कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे.मात्र त्यांचा आविर्भाव हा राज्य सरकारवर व शेतकऱ्यांवर आपण उपकार करत असल्याचा दिसून येत आहे.

“दुष्काळी भागातील काही गावांना तब्बल ५६ वर्षांनी पहिल्यांदा निळवंडे कालवा कृती समितीच्या न्यायिक व रस्त्यावरील लढ्यामुळे पाणी मिळाले आहे.मात्र ते वापरण्यासाठी शेतकऱ्यांना वीजच उपलब्ध नाही यामुळे हे सर्व राजकीय व्यवस्था जाणीवपूर्वक तर करीत नाही ना”-रामनाथ पाडेकर,उपसरपंच,बहादरपुर ग्रामपंचायत,ता. कोपरगाव.

  दरम्यान त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील उदाहरण खूप बोलके आहे.या ठिकाणी महावितरण कंपनीला जवळके ग्रामपंचायतीने बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळावी यासाठी डिसेंबर सन-२०२२ मध्ये ठराव घेऊन महावितरण कंपनीच्या मागणी प्रमाणे किमान १० एकर क्षेत्र देण्याचे ठरवले होते.त्यानुसार येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी महावितरण उपविभाग राहाता,कोपरगाव,कार्यकारी अभियंता संगमनेर,अधीक्षक अभियंता अहिल्यानगर आदींकडे सातत्याने दोन वर्षे पाठपुरावा केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध विभागाच्या ना हरकती घेण्यास मोठी यातायात केली आहे.त्या पूर्ण झाल्यावर राहाता उपविभाग हा ‘नॅकॉफ’ या सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपनीला देण्यात आला होता.त्यांचे प्रतिनिधी सुजय हिवरे यांच्याकडे ग्रामपंचायत सरपंच सारिका थोरात व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.मात्र ऑगस्ट २०२५ मध्ये एकाएकी या कंपनीने एकाच ठिकाणी आम्हाला ३३ एकराची जमीन हवी अशी अडेलतट्टूची भूमिका घेऊन नकार दिला आहे.शेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या धोंडेवाडी ग्रामपंचायतीने आधीच त्यासाठी ०८ एकर जमीन मंजूर केली आहे.मात्र त्यास त्यांनी नकार दिला आहे.त्यामुळे सगळे मुसळ केरात गेले आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री.जवरे यांनी सातत्याने नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि महावितरण कंपनीत पाठपुरावा केला.मात्र त्यांनी हतबलता दाखवली असल्याचे दिसून आले आहे.यासाठी दुसरी कंपनीला हे काम द्या अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयातून आधीच्या कंपनीने नकार दिल्याशिवाय दुसऱ्या कंपनीला काम देता येत नाही अशी हतबलता दाखवली आहे.त्यामुळे सरकार व जिल्हाधिकारी कार्यालय हे या खाजगी कंपन्यांच्या तालावर नाचत आहे का ? असा सवाल निर्माण झाला आहे.याबाबत शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनीही संबंधित कंपनीच्या व महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना सातत्याने पाठपुरावा करून ही उपयोग झाला नसल्याचे दुर्दैवाने उघड झाले आहे.

राहाता उपविभागात आतापर्यंत कंपन्याच्या या अडेलतट्टू पणामुळे केवळ कोऱ्हाळे याठिकाणी ०५ मेगावॅट मुख्यमंत्री सौर प्रकल्प केवळ मार्गी लागला आहे.जवळके येथे १० एकर जागा मंजूर आहे.याशिवाय धोंडेवाडी या ठिकाणी ०७ एकर काकडी याठिकाणी ०९ एकर शिंगवे या ठिकाणी खाजगी व्यक्तीने २५ एकर जमीन मुख्यमंत्री सौर योजना-२ साठी मंजूर केली आहे.मात्र कोऱ्हाळे वगळता कोठेही हा सौर प्रकल्प सुरू झालेला नाही हे विशेष ! यातील बहुतांशी प्रकल्प हे पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील आहे हे विशेष !

   दरम्यान कोपरगाव तालुक्यातील मात्र महावितरण कंपनीच्या राहाता उपविभागातील रांजणगाव देशमुख या ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात एकूण १० एम.व्ही.ए.विजेची गरज आहे.मात्र ती पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळत नाही.परिणामी अनेक विद्युत पंप निकामी होत आहे.पाणी पुरवठा योजनेचे पंप जळून जात आहे.परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी असूनही ते वेळेवर देता येत नाही.तीच बाब शेतकऱ्यांची आहे.यंदा पावसाळा चांगला झाला भूजल पातळी चांगली आहे.मात्र पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने वर्तमानात,”बाप भीक मागू देईना आणि आई जेऊ घालिना” अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे.यावर कोणीही राजकीय नेता बोलण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत नाही.मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या जोरदार तयारीत असल्याचे मात्र दिसून येत आहे.त्यातून शेतकऱ्यांच्या या समस्येला कोणी वाली नाही हे उघड होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळावी यासाठी डिसेंबर सन-२०२२ मध्ये ठराव घेऊन महावितरण कंपनीच्या मागणी प्रमाणे किमान १० एकर क्षेत्र देण्याचे ठरवले होते.त्यानुसार येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी महावितरण उपविभाग राहाता,कोपरगाव,कार्यकारी अभियंता संगमनेर,अधीक्षक अभियंता अहिल्यानगर आदींकडे सातत्याने दोन वर्षे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठपुरावा करूनही अधिकारी बधले नाही हे विशेष !

    दरम्यान राहाता उपविभागात आतापर्यंत कंपन्याच्या या अडेलतट्टू पणामुळे केवळ कोऱ्हाळे याठिकाणी ०५ मेगावॅट मुख्यमंत्री सौर प्रकल्प केवळ मार्गी लागला आहे.जवळके येथे १० एकर जागा मंजूर आहे.याशिवाय धोंडेवाडी या ठिकाणी ०८ एकर काकडी याठिकाणी ०९ एकर शिंगवे या ठिकाणी खाजगी व्यक्तीने २५ एकर जमीन मुख्यमंत्री सौर योजना-२ साठी मंजूर केली आहे.मात्र कोऱ्हाळे वगळता कोठेही हा सौर प्रकल्प सुरू झालेला नाही हे विशेष ! यातील बहुतांशी प्रकल्प हे पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील आहे हे विशेष ! त्यामुळे हे अपयश कोणाचे आहे हे समजण्यास मार्ग नाही.याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी शहा येथील १३२ के.व्ही.ए.उपकेंद्राचे जोरदार ढोल ताशे वाजवून उद्घाटन करण्यात आले मात्र एक वर्षे उलटूनही अद्याप या उपकेद्राची वीज शेतकऱ्यांना दिवास्वप्न ठरले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जीव धोक्यात घालून आपल्या रब्बी पिकांना पाणी देण्यास जावे लागत आहे.त्यात टाकळी फाटा आणि येसगाव सारखी जीवावर बेतणारी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा गंभीर सवाल निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यर्कते बाबासाहेब गव्हाणे यांनी विचारला आहे.गंभीर घटना घडून गेल्यावर व शेतकऱ्यांची जीवित हानी झाल्यावर विधानसभेत आरडाओरडा करून उपयोग होणार नाही हे लोकप्रतिनिधींनी समजून घेणे गरजेचे आहे.

   दरम्यान याबाबत बहादरपुर येतील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामनाथ पाडेकर यांनीही असाच सवाल निर्माण केला असून,”दुष्काळी भागातील काही गावांना तब्बल 56 वर्षांनी पहिल्यांदा निळवंडे कालवा कृती समितीच्या न्यायिक व रस्त्यावरील लढ्यामुळे पाणी मिळाले आहे.मात्र ते वापरण्यासाठी शेतकऱ्यांना वीजच उपलब्ध नाही यामुळे हे सर्व राजकीय व्यवस्था जाणीवपूर्वक तर करीत नाही ना असा सवाल विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close