अपघात
रेल्वे मार्गावर पुन्हा एक इसमाचा मृत्यू!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दौंड ते मनमाड या लोहमार्गावर असलेल्या कोपरगाव ते कान्हेगाव या विभागात असलेल्या कि.मी.सेक्शन ४५९/८-१० यामध्ये दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये सवत्सर गावचे शिवारात वय वर्षे 45 असलेल्या एक अज्ञात इसमाचे शव आढळून आले आहे.त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याबाबत कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांस मृत घोषित केले आहे.
भारतात रेल्वे रुळांवर होणारे अपघात आणि मृत्यू ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक समस्या बनली आहे.अनधिकृतपणे रूळ ओलांडणे,चालताना किंवा रुळांवर मोबाईलवर बोलण्यात मग्न असणे,शॉर्टकट वापरणे आणि धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करणे यामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो.वेळेची बचत करण्याच्या प्रयत्नात लोक पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग न वापरता थेट रूळ ओलांडतात.रुळांवर चालताना इयरफोन लावणे किंवा मोबाईलवर बोलणे यामुळे ट्रेनचा हॉन ऐकू येत नाही. ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे किंवा चुकीच्या दिशेने उतरल्याने होणारे अपघात.स्थानक परिसरात पुरेशी सुरक्षा भिंत किंवा कुंपण नसणेआदी कारणामुळे हे अपघात होत असले तरी कोपरगाव तालुक्यात कोपरगाव कान्हेगाव शिवारात याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे आढळून येत आहे.विशेषतः संवत्सर हद्दीतील रामसिंग बाबा मंदिर परिसरात असलेल्या रेल्वे पुलाजवळ याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.यातील मयत इसम हा 45 वर्षीय असून तो कोपरगाव ते कान्हेगाव या विभागात असलेल्या कि.मी.सेक्शन ४५९/८-१० यामध्ये दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये सवत्सर गावचे शिवारात आढळून आला आहे.त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याबाबत कोपरगाव तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांस मृत घोषित केले आहे.याबाबत घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचेसह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी कोपरगाव रेल्वे उपस्टेशंन प्रबंधक एस.एस.श्रीवास्तव यांनी दिलेल्या खबरीवरून आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक ५७/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहीता १९४ प्रमाणे नोंद केली आहे.



